Buldhana Politics : नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदींनी हॅटट्रीक साधली आहे. यामध्ये चार वेळ खासदार म्हणून बाजी मारणाऱ्या शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांना पहिल्यांदाच राज्यमंत्री पद मिळालं आहे.
काही जण जे नाही करायचे ते करून बसतात आणि धाडकन पडतात. असाच एक किस्सा महाराष्ट्राच्या विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात घडला आहे. प्रतापराव जाधव पडले. त्याचे झाले असे की जिल्ह्यातील खामगाव येथे कार्यकर्त्यांनी त्यांची वहीतुला आयोजित केली होती. नवीन नवीन मंत्री झालेल्या प्रतापरावांनी स्वतःचेच वजन केले. दुसऱ्या पारड्यातील वह्यांचे वजन जास्त झाले आणि प्रतापरावांचे पारडे वर गेले. तेवढ्यात त्यांचा तोल गेला आणि पारड्यात बसलेले प्रतापराव जाधव धाडकन खाली पडले.
जाधवांना स्वतंत्र प्रभार
एका कार्यक्रमात नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासोबत घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार प्रताप गणपतराव जाधव यांना अलीकडेच पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री पद (स्वतंत्र प्रभार) देण्यात आले आहे.
Vijay Wadettiwar : बेजबाबदार सरकारमुळे स्फोटांची मालिका सुरूच !
कित्येक वर्षानंतर बुलढाणा जिल्ह्याला केंद्रात खासदार प्रतापराव जाधव यांच्या रूपाने मंत्रिपद मिळाले. याचा संपूर्ण जिल्ह्यात उत्साह असून केंद्रीय आयुष्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच प्रतापराव जाधव गुरुवारी सकाळी जिल्ह्यात दाखल झाले. यावेळी शेगावात त्यांच्या स्वागतासाठी फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी, हार-तुरे, सत्कार आणि पेढेतुला करण्यात आली.
केंद्रीय आयुष व कुटुंब कल्याण मंत्री म्हणून प्रतापराव जाधव यांनी शपथ घेतली. केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज गुरुवारी पहिल्यांदाच त्यांचे बुलढाणा जिल्ह्यात आगमन झाले. आज सकाळी प्रतापराव जाधव यांनी शेगाव येथे संत गजानन महाराज यांच्या मंदिरात जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे.
या पालखीमध्येही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव सहभागी झाले. वारकऱ्यांना अभिवादन करीत संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले. येणाऱ्या काळात देशातील आरोग्य सुविधा अधिक मजबूत करून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला त्याचा लाभ उत्तमरित्या कसा मिळेल, या दृष्टिकोनातूनही उपाययोजना करण्याच्या दृष्टीने काम करणार असल्याची प्रतिक्रिया मंत्री प्रतापराव जाधव यांनी बोलताना व्यक्त केली होती. दरम्यान त्यांचा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.