महाराष्ट्र

Shiv Sena : जगातील सर्वांत मोठे मेट्रोचे जाळे महाराष्ट्रात

Milind Deora : विरोधकांच्या टिकेला सडेतोड उत्तर

Strong Reply : केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर काम करीत आहे. गेल्या चार महिन्यात एक लाख कोटींची गुंतवणूक राज्यात झाली आहे. महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात देशात अग्रसर ठरला आहे. मेट्रो प्रकल्पांसाठी 15 हजार कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे जगातील सर्वांत मोठे मेट्रोचे जाळे मुंबई एमएमआर रिजनमध्ये विणले जात आहे. शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी ही माहिती दिली. मबाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकारने राज्याला काय दिले, असे विचारणाऱ्या विरोधकांवर खासदार देवरा यांनी शरसंधान साधले.

गेल्या चार महिन्यात वाढवण बंदरासह विविध प्रकल्पातून महाराष्ट्राला एक लाख कोटींची गुंतवणूक मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पुणे आणि ठाण्याच्या मेट्रो प्रकल्पांना 15 हजार कोटींचा निधी मंजूर केला. मेट्रो प्रकल्पांचा विस्तार मुंबई आणि पुणे शहरासाठी महत्वाचा ठरणार आहेत. काही लोक सत्तेत असताना मेट्रोला विरोध करत होते. अशात एमएमआर भागातील नागरिकांच्या वेदना दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. अत्याधुनिक वाहतूक प्रणाली विकसित होत आहे. आगामी येत्या काळात एमएमआर क्षेत्रात 14 मेट्रो लाइन अस्तित्वात येतील. त्यामुळे मुंबई महानगरातील नागरिकांचा दैनंदिन प्रवास सुखकर होईल, असा विश्वास खासदार देवरा यांनी व्यक्त केला.

आघाडीत बिघाडी

महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी झाली आहे. सध्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरुन रस्सीखेच सुरू आहे. यावर बोलताना खासदार देवरा म्हणाले की, काँग्रेसची कार्यपद्धती आपल्याला चांगलीच ठाऊक आहे. काँग्रेस कधीही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नावाला सहमती देणार नाहीत. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेते महायुती सरकार आणि केंद्रावर टीका करीत आहेत. केंद्रीय अर्थसकल्पातून महाराष्ट्राला काहीच मिळाले नाही, अशी टीका होत आहे. त्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी यावर स्पष्टीकरण दिले होते. राज्याच्या अर्थसंकल्पावरूनही विरोधक टीका करीत आहे.

Shiv Sena : शिंदे गटाच्या आमदाराने तलवारीने कापला केक

महाराष्ट्रावर प्रचंड कर्ज असतानाही विविध योजना जाहीर करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आदींमुळे सरकारी तिजोरीवर ताण पडणार असल्याची ओरड होत आहे. राज्य सरकारवर असलेल्या कर्जावरून विरोधकांनी रान पेटविले आहे. काँग्रेस (Congress), शिवसेना सरकारवर सडकून टीका करीत आहे. यासर्वांना भाजपनंतर आता शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात येत आहे. त्यामुळे देवरा यांनीही विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!