महाराष्ट्र

Bhavana Gawali : ताई आता विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक

Shiv Sena : गृह मतदारसंघातून लढण्याची केली इच्छा व्यक्त

New Beginning : यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या माजी खासदार भावना गवळी यांनी आता विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे भावना गवळी यांनी आपल्या गृह मतदारसंघावर दावा केला आहे. रिसोडची जागा शिवसेनेकडे आली आणि पक्षाने आदेश दिला तर, आपण या मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचं भावना गवळी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे रिसोड मतदारसंघावर भावना गवळी यांच्याकडून दावा करण्यात आल्याने महायुतीतील इच्छुकांची कोंडी झाली आहे.

नाराजीची चर्चा

लोकसभा निवडणुकीत यवतमाळ-वाशिम लोकसभा (Lok Sahba) मतदारसंघात भावना गवळी यांना डावलून शिंदेंच्या शिवसेनेकडून राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्याचा फटका महायुतीला बसला. राजश्री पाटील यांचा येथे पराभव झाला. तिकीट नाकारल्याने भावना गवळी नाराज झाल्याच्या चर्चा यादरम्यान रंगल्या होत्या. त्यांना धान परिषदेवर भावना गवळी यांची वर्णी लावून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

नवी सुरुवात करणार

लवकरच राज्यात विधानसभेच्या निवडणूक पार पडणार आहे. सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. इच्छुकांनीही जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. महायुती असो की महाविकास आघाडी, अनेक इच्छुकांची गर्दी सध्या पाहायला मिळत आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमदार भावना गवळी यांनीही इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या गृह मतदारसंघात लढण्याचा निर्धार केला आहे.

भावना गवळी यांचं रिसोड या विधानसभा मतदारसंघात गाव आहे. त्यामुळे या मतदारसंघात लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गवळी म्हणाल्या, रिसोडची जागा शिवसेनेकडे मिळाली आणि पक्षाने आदेश दिला, तर आपण निवडणूक लढविण्यास तयार आहोत. असं नमूद करीत भावना गवळी यांनी रिसोड मतदारसंघावर दावा केला. पक्षातील नेत्यांनी आदेश दिल्यास वाशिम जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार जिंकण्यासाठीसाठी काम करणार असल्याचंही आमदार भावना गवळी यांनी म्हटलं आहे.

Lok Sabha Election : भावना गवळी म्हणाल्या, ‘मी नाराज होणाऱ्यांपैकी नाही! प्रचाराला लागणार

रिसोड मध्ये गर्दी

रिसोड मतदारसंघात सध्या काँग्रेसचे वर्चस्व आहे. गेल्या तीन टर्म पासून अमित झनक येथे आमदार आहेत. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसह महायुतीतही इच्छुकांची गर्दी या मतदारसंघात पाहायला मिळत आहे. रिसोड मतदारसंघात महायुतीमध्ये शिंदेंची शिवसेना दावा करत आहे. त्यामुळे आता महायुतीमध्ये या जागेवरून वादाची शक्यता नाकारता येत नाही. या मतदारसंघात 2009 पासून काँग्रेसने आपला झेंडा कायम ठेवला. 2019 मध्ये युती झाल्यावर रिसोड मतदारसंघ हा शिवसेनेला सुटला होता. त्यामुळे आता आमदार भावना गवळी या मतदारसंघासाठी इच्छुक आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!