महाराष्ट्र

Manisha Kayande : असीम सरोदे उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय

Shiv Sena : विशिष्ट राजकीय पक्षांसाठी ‘सिलेक्टिव्ह अॅक्टिव्हिझम’

Badlapur Sexual Assault : मुंबईतील बदलापूर येथे शाळेत बालिकांवर लैंगिक अत्याचार झाले. या संवेदनशील प्रकरणी पोलिसांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे वकील असीम सरोदे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय आहेत. ते ‘सिलेक्टिव्ह अॅक्टिव्हिझम’ करत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी केली. बालिकांवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याचा असीम सरोदे यांना एवढा पुळका का, असा सवाल डॉ. कायंदे यांनी केला. 

असीम सरोदे हे वकील आहेत. त्यांना कोणत्याही मुद्द्यावर याचिका दाखल करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांनी पोलिसांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर मात्र तीव्र आक्षेप आहे. त्यामुळे सरोदे एखाद्या राजकीय पक्षाचा अजेंडा चालवित आहेत का, अशी शंका येत असल्याचे डॉ. कायंदे म्हणाल्या. गेल्या काही महिन्यांचा घटनाक्रम पाहिला तर सरोदे ठराविक राजकीय पक्षांना फायदा होईल, अशीच भूमिका घेत असल्याचेही डॉ. कायंदे म्हणाल्या.

भेटीचे फोटो

उद्धव ठाकरे आणि असीम सरोदे यांची भेट झाली आहे. ठाकरे कुटुंब आणि सरोदे यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर आहेत. हेच वकील असीम सरोदे हे काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या मंचावर बोलताना दिसले होते. सरोदे आणि ठाकरे यांच्या भेटीगाठींवरुन सरोदे ठाकरे यांच्या सांगण्यावरुन याचिका दाखल करतात का, असा खरमरीत सवाल डॉ. कायंदे यांनी केला. बदलापूर प्रकरण घडलं तेव्हा उत्स्फूर्तपणे जनआंदोलन झाले होते. विरोधकांनी आरोपीला ताबडतोब फाशी द्या, अशी मागणी केली होती. याबाबत खटला सुरू होता. रिमांडमध्ये असताना अक्षयने पोलिसांवर गोळीबार केला. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.

अक्षयच्या चकमकप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करीत वकील असीम सरोदे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावरही अॅड. कायंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. कोर्टात जाण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे मात्र वकील सरोदे यांचा पोलिसांबाबत घेतलेल्या भूमिकेवर संशय निर्माण होतो, असे डॉ. कायंदे म्हणाल्या. कोविड काळात मुंबईत मोठा घोटाळा झाला. बॉडीबॅग घोटाळा उघडकीस आला. खिचडीतही घोटाळा झाला. अशी कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची मालिका आहे. त्याबाबत असीम सरोदे कधीच न्यायालयात का गेले नाही, असा सवालही डॉ. कायंदे यांनी केला.

Encounter : विरोधक फक्त वातावरण तापवत आहेत!

हत्येबाबतही मौन 

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) काळात मनसुख हिरेन यांची हत्या झाली. हिरेन यांच्या हत्येबाबत असीम सरोदे यांनी न्यायालयात धाव का घेतली नाही, असा सवालही त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या काळात निर्भय बनो करण्यात आले. आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या विरोधात सरोदे यांनी आरोपांची राळ उठवली होती. राज्यपालांबाबतही सरोदे यांनी जाहीर अपशब्द काढले होते. संसदेमध्ये अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणाऱ्या आरोपीचे वकीलपत्र असीम सरोदे यांनीच घेतले होते. संसदेत जे लोक घुसखोरी करतात, त्यांच समर्थन कसे काय करता येऊ शकेल, असेही डॉ. कायंदे यांनी विचारले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!