Shiv Sena : मोदींची हवा नाही हे बोलणे अत्यंत चुकीचे आहे. मोदी आहेत म्हणून आम्ही सर्वजण आहोत हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. युतीची महायुती तयार झाली हे नाकारून चालणार नाही. त्यांच्या मुळेच तुम्हाला उमेदवारी मिळाली हे लक्षात ठेवायला पाहिजे. अशा शब्दात अमरावती तथा बुलढाण्याचे माजी खासदार तथा शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी अमरावतीच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार नवनीत राणा यांचे नाव न घेता त्यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला. अडसूळ शेगावात पत्रकारांशी बोलत होते.
संत नगरी शेगाव येथे श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने रामनवमी उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला गेला. यासाठी राज्यभरातून लाखो भाविक येथे नतमस्तक झालेत. अशातच बुलढाणा आणि अमरावतीचे माजी खासदार तथा शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना नवनीत राणांवर टीका केली.
प्रचार नाहीच
आपण कुठल्याही परिस्थितीत राणांचा प्रचार करणार नाही. नाही म्हणजे नाही अशा रोखठोक शब्दात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. नवनीत राणांच्या उमेदवारी संदर्भात मी जे काही केले होते त्यासंदर्भात मला अमित शहा यांच्याकडून थांबण्याची विनंती करण्यात आली. या बदल्यात आपल्याला राज्यपाल करण्याचा शब्द देण्यात आला होता. राणांच्या जात प्रमाणपत्र बाबतच्या न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की, मीच नाही तर संपूर्ण देशातील नागरिकांना हा निर्णय पटलेला नाही. हा निर्णय लागलेला नाही तर लावून घेतलेला वाटतो. ही प्रत्येकाच्या मनात शंका आहे. मला त्यासाठी न्यायालयात जाता येईल. परंतु मला बाकीच्या मंडळींसाठी थांबावे लागेल. कारण हा फक्त माझ्यापुरता निर्णय मर्यादित नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा सर्वांसाठी तयार होतो. उद्या प्रत्येकाच्या मनामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होईल की मी खोटा सर्टिफिकेट आणायचे आणि मला हायकोर्ट, सुप्रीम कोर्टही काही करणार नाही.
Lok Sabha Election : राणांना दिल्लीत पोहचवणार मनसेचे ‘इंजिन’?
तीनशे पार होतील
देशाच्या राजकारणाबाबत विचारले असता ते म्हणाले की, 400 पार नसले तरी 300 पार हमखास होतील असे म्हणायला हरकत नाही. कुठल्याही परिस्थितीत मी राणाच्या प्रचाराला जाणार नाही. आटापिटा करून मंडळींनी मला थांबविले. राणाला उमेदवारी दिली. काही तत्व आहेत माझी. तडजोडी मध्ये काही गोष्टी महायुतीत माझ्या इच्छे विरुद्ध मी स्वीकारल्या. मी जाहीर केलेले आहे, राजकारण सोडेल पण प्रचाराला जाणार नाही. मी वरिष्ठांना सांगितले आहे. संपूर्ण देशात जाईल, पण तिथे जाणार नाही