Mahavikas Aghadi Vs Mahayuti : अजित पवार यांच्यासारख्या परखड व्यक्तिमत्त्वाला जर तोंड लपवून जावे लागते असेल, तर हे अतिशय वाईट आहे. हा स्वाभिमान गहाण ठेवण्यासारखा प्रकार आहे, अशी खोचक टीका शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. सत्तेत सामील होण्याआधी अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची अनेकवेळा भेट घेतली. या भेटेवेळी त्या बैठकीचे किस्से अजितदादांनी सांगितले. सत्तेत सामील होण्याआधी शाह यांच्यासोबत अनेकवेळा बैठकीला गेलो. या बैठकीला जाताना मास्क आणि टोपी घालून गेल्याची कबुली त्यांनी दिली आहे.
अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीने त्यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही कबुलीवरून अजित पवार यांना टार्गेट केले आहे. अजित पवारांनी खोचक टीका केल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी पवारांबद्दल भाष्य केले आहे. त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. अजितदादा यांच्या सरख्या परखड व्यक्तीला तोंड लपवून जावे लागत असेल तर हे वाईट आहे, असे दानवे म्हणाले.
किती तुकडे टाकतात
आमच्या गद्दारांना किती तुकडे टाकतात, ते पाहावे लागेल, अशा शब्दात दानवे यांनी बंडखोर आमदारांनी टीका केली. भाजप आतापर्यंत कायम कुटनीतीचे राजकारण करत आली आहे. त्यांची किती खालच्यास्तराची मानसिकता आहे, हे वेळोवेळी दिसून आले आहे. कोर्टाने देशमुख यांच्यावर स्पष्ट भूमिका व्यक्त केली आहे. भाजपचे वागणे हे दुष्टपणाचे आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या राजकरणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच जागावाटपावरून महायुतीमध्ये वाद निर्माण झाल्याची चर्चा आहेत. यावर बोलताना दानवे म्हणाले की, प्रत्येक पक्ष आपली भूमिका ठरवत असतो. नेते ही भूमिका ठरवत असतात. नारायण राणे यांना किती पक्ष किंमत देतो हे पाहावे. अजित दादा आणि आमच्या गद्दारांना ते किती तुकडे टाकतात, ते पाहावे लागेल, असेही ते म्हणाले.
लव्ह जिहाद प्रकरणावरुन दानवे यांनी नितेश राणे यांच्यावर देखील निशाणा साधला. माझे नितेश राणे यांना आव्हान आहे की, असे प्रकार होत असतील तर कारवाई करा. राज्यात आणि देशात तुमचे सरकार आहे. माझे नितेश राणे यांना आव्हान आहे की, यंत्रणांना तपास करायला लावा. कारवाई होत नसेल तर याचा अर्थ म्हणजे तुम्ही चिथावणी देत आहात का? तुम्ही तुमच्या राज्यात यावर कारवाई करा, असेही दानवे म्हणाले.