Shiv Sena News : बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचाराचा आढावा घेण्यासाठी शेगाव कडे निघालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐनवेळी ‘प्लान चेंज’केला आहे. एकनाथ शिंदे शनिवार (ता. 13) शेगाव येथे आढावा बैठकीसाठी येणार होते. परंतु त्यांचा शेगाव दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. त्यांचा दौरा आता रविवार (ता. 14) रोजी बुलढाण्यात होण्याची शक्यता आहे.
शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार असलेल्या प्रतापराव जाधव यांच्या प्रचाराचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेगावला येणार होते. त्यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने माध्यमांमध्ये आल्या होत्या. परंतु त्यांच्या या दौऱ्यात वेळेवर बदल झाला करण्यात आला आहे. शेगाव ऐवजी ही आढावा बैठक आता बुलढाण्याला होणार असल्याची माहिती आहे. शनिवार ऐवजी रविवारी होणार आहे.
Lok Sabha Elections : सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ‘अच्छे दिन’
प्रतापराव जाधव हे मागील 15 वर्षांपासून बुलढाणा जिल्ह्याचे खासदार आहेत. तेव्हाच्या संयुक्त शिवसेनेकडून ते निवडून आलेले होते. आता शिवसेना पक्ष दोन गटात विभागला गेल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये खरी लढत दोन्ही शिवसेनेमध्ये होणार आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतर खासदारां मधून शिंदे गटात सर्वप्रथम प्रतापराव जाधव हेच असल्याने जाधव यांना निवडून आणण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यामुळे शिंदे यांनी तशा व्यूहरचना केलेली आहे. त्यासाठी त्यांनी बुलढाणा जिल्ह्याचा दौरा निश्चित केला होता. यापूर्वीही दोनदा एकनाथ शिंदे बुलढाण्यात येऊन गेले आहेत.
ठाकरेंच्या वाऱ्या
शिवसेनेच्या दुसऱ्या गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील बुलढाण्यात येऊन गेलेत. त्यांच्या समवेत खासदार संजय राऊत हे देखील होते. प्रतापराव जाधव यांच्यावर टीका करीत ठाकरे गटाने बुलढाण्यात रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे येथे विजय मिळविण्यासाठी दोन्ही शिवसेनेचा कस लागणार आहे. त्यामुळे बुलढाण्यातील यंदाची निवडणूक म्हणजे ‘काटेकी टक्कर’ होणार आहे.