NCP Point Of View : मागील आठवड्यात राज्यातील विधानपरिषद निवडणूक पार पडली. 11 जागांसाठी मतदान झाले. त्यानंतर लगेचच मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत महायुतीने (Mahayuti) नऊ जागांवर विजय मिळवत वरचष्मा राखला. एकूण तीन जागा निवडून आणण्याचे महाविकास आघाडीचे प्रयत्न अयशस्वी ठरले. महाविकास आघाडीला फक्त दोन जागांवरच समाधान मानावे लागले. काँग्रेसच्या (Congress) प्रज्ञा सातव आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांच्या रुपाने विजय मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पुरस्कृत शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला.
पराभवाची वेगवेगळी कारणे समोर येत आहेत. पाटलाच्या पराभवाचे नेमके कारण शरद पवार यांनी स्पष्ट केले. ते पुण्यात (Pune) प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आले. महाविकास आघाडीच्या मिलिंद नार्वेकर आणि प्रज्ञा सातव यांचा विजय झाला. राष्ट्रवादी शरद पवार गट पुरस्कृत पाटील यांना अपयश आले. जयंत पाटील यांच्यासोबत एकत्रित निर्णय झाला नव्हता. एकत्रित म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाने (Shiv Sena Uddhav Thackeray) उमेदवार ठरवण्याचा निर्णय झाला नव्हता.
साहेबांनी गणितच मांडले
राष्ट्रवादी काँग्रेसची 12 मते होती. आम्हाला शेकापला पाठिंबा द्यावा असे वाटले, असे शरद पवार म्हणाले. लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेऊन लढलो. ती लढत असताना सीपीआय, सीपीएम, शेकाप सोबत होते. त्यांनी आमच्याकडे काही जागा मागितल्या. ते देण्याच्या स्थितीत नव्हतो. तेव्हा शिवसेना, काँग्रेस आणि आम्ही एकत्र बसलो. डाव्यांना आता काही देऊ शकत नाही, पण विधान परिषद, विधानसभेत त्यांना मदत करू असे ठरले. सर्वांनी हे मान्य केले. लोकसभेत यश मिळाले. मनात होते की संधी आली तर जागांचा विचार करावा, असे पवार म्हणाले.
कुणी कुणाला फसवलेले नाही. विधान परिषद निवडणुकीत रस नव्हता. त्याचे कारण म्हणजे राष्ट्रवादीकडे फक्त 12 मते होती. शेतकरी कामगार पक्षाला निवडणुकीत पाठिंबा द्यावा, असे वाटले. लोकसभा निवडणूक (Lok Sabha) लढताना त्यांना विधान परिषद आणि विधानसभा निवडणुकीत मदत करण्याचे ठरले होते. त्यामुळे सीपीआय, सीपीएम, शेतकरी कामगार पक्षाला मदत व्हावी, हा हेतू होता. मित्र पक्षांनीही ते मान्य केले होत. विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे 12 मते होती. ती आम्हाला शेकापला द्यायची इच्छा होती, असे पवार यांनी सांगितले.
Shiv Sena : बाळासाहेबांचे विचार टिकवणारे एकनाथ शिंदे खरे राष्ट्रभक्त
राष्ट्रवादी काँग्रेसची 12 मते शेकापला जाणार आहेत, हे मित्रपक्षांना कळविले होते. त्याचवेळी काँग्रेस आणि शिवसेनेने उमेदवार उभा केला. पण विधान परिषद निवडणुकीतील डावपेचांबात मतभिन्नता होती. त्यामुळे त्याचा परिणाम दिसून आला असे पवार म्हणाले. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसला. काँग्रेसचे सात आमदार फुटल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. या फुटीर आमदारांच्या नावाचा अहवाल प्रदेश काँग्रेसने दिल्लीला पाठविला आहे. या फुटीर आमदारांवर कारवाई झालेली नाही.