महाराष्ट्र

Nagpur constituency : मुळक काय करतील? हिंगण्याचीही दारं बंद!

Assembly Election : रमेश बंग यांना उमेदवारी; शरद पवारांची नवी खेळी

Congress Vs BJP : राजेंद्र मुळक यांच्यासाठी अखेरची आशा असलेला हिंगणा मतदारसंघही आता त्यांच्या हातून गेला आहे. या मतदारसंघात पूर्वीपासून राष्ट्रवादीच लढत आले असले तरीही मुळकांना चमत्काराची अपेक्षा होती. पण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आणखी एक नवी खेळी खेळली आहे. या मतदारसंघाकडे कुणाची वाकडी नजर जाण्यापूर्वी माजी मंत्री रमेश बंग यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता मित्र पक्षांनी दावा करण्याचा विषय देखील संपुष्टात आला आहे.

उमेदवारी हुकली का?

राजेंद्र मुळक यांचा एकही मतदारसंघ निश्चित राहिलेला नाही. ते उमरेडचे आमदार होते. त्यानंतर विधानपरिषदेत गेले. दरम्यान, कामठीमधूनही लढले. पण यश आलं नाही. नंतर रामटेकमध्ये मुक्काम हलवला. तिथे जनसंपर्क वाढवला. पण तिथेही उमेदवारी मिळाली नाही. अशात हिंगणा हा एकमेव मतदारसंघ त्यांच्यासाठी शिल्लक होता. मात्र, शरद पवारांनी त्यांचे विश्वासू आणि राज्यात मंत्री राहिलेले रमेश बंग यांना उमेदवारी जाहीर केली.

रमेश बंग यांच्या उमेदवारीमुळे केवळ मुळकच नव्हे तर बंग यांचे पूत्र दिनेश यांच्याही स्वप्नांना खिळ बसली आहे. यंदा आपल्याला हिंगण्यातून लढण्याची संधी मिळेल, असे त्यांना वाटले होते. मात्र शरद पवारांनी जुन्या आणि अनुभवी कार्यकर्त्यावर विश्वास टाकला आहे. रमेश बंग ऐंशीच्या घरात आहेत. पण भाजपची हिंगण्यातील घोडदौड ते थांबवू शकतात, असा विश्वास शरद पवारांना आहे. त्यामुळेच त्यांना संधी देण्यात आल्याचे बोलले जाते. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. 

राजेंद्र मुळक यांना कुठल्याही परिस्थिती विधानसभेत उतरायचे असेल तर अपक्ष लढण्याशिवाय किंवा पक्ष बदलण्याशिवाय पर्याय नाही. अपक्ष लढण्याचे त्यांचे मार्ग मोकळे आहेत. मात्र भाजप किंवा इतर सर्वच पक्षात आधीपासून उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असताना त्यांना किती महत्त्व दिले जाऊ शकते, हा प्रश्न कायम आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पश्चिम नागपूरसाठी राजेंद्र मुळक यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. मात्र महाविकास आघाडी नव्हे तर महायुतीकडून ते लढणार अशी चर्चा होती. मुळक भाजपमध्ये प्रवेश करणार आणि पश्चिम नागपूरमधून लढणार, असेही सांगितले जात होते. पण यात किती तथ्य आहे, हे आज किंवा उद्याच स्पष्ट होईल.

Nagpur constituency : राजेंद्र मुळक यांचं भवितव्य कधी ठरणार?

दहा वर्षांनंतर मेघे विरुद्ध बंग

रमेश बंग यांनी 1995, 1999 आणि 2004 अशा सलग तीन निवडणुका कळमेश्वर विधानसभा मतदारसंघातून जिंकल्या होत्या. त्यानंतर हिंगणा मतदारसंघाची स्थापना झाली आणि सलग दोन निवडणुकांचा पराभव बंग यांच्या वाट्याला आला. 2009 च्या निवडणुकीत तर भाजपचे विजय घोडमारे यांच्याकडून अवघ्या 700 मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपचे समीर मेघे यांनी चांगला जम बसवला आहे. हिंगणा मतदारसंघाचे दहा वर्ष प्रतिनिधित्व ते करीत आहेत. 2014 मध्ये समीर मेघे यांनी रमेश बंग यांना जवळपास 25000 मतांनी पराभूत केले होते, हे विशेष. आता दहा वर्षांनंतर पुन्हा मेघे विरुद्ध बंग असा सामना रंगणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!