महाराष्ट्र

Lok Sabha Election : धोक्याला उत्तर चाणक्य नितीनेच

Ashish Shelar : पक्षांतील फुटीवर आशीष शेलार म्हणाले..

BJP Politics : एकनाथ शिंदे जून 2022 मध्ये काही आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले. बंडखोरी केल्यानंतर त्यांनी भाजपसोबत युती केली व सरकार स्थापन केले. एका वर्षाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंडखोरी केली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षातील फुटीला भाजपला जबाबदार ठरविले जात आहे. परंतु, पक्ष फुटीला शरद पवार आणि उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचे भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले.

आशिष शेलार यांना विचारण्यात आले की, महायुतीचे सरकार शिंदे बरोबर आल्याने भक्कम झाले होते. मग भाजपाला अजित पवारांची गरज का भासली? उत्तर देत शेलार म्हणाले, “अजित पवार फुटण्यास शरद पवार हेच जबाबदार आहेत. पक्ष प्रमुखांच्या आपल्या मुलावरील आणि मुलीवरील प्रेमापोटी राज्यातील दोन पक्ष फुटले.

ठाकरेंनी दिला धोका, तर शरद पवारांची लबाडी

शरद पवार यांनी अजित पवारांऐवजी स्वतःच्या मुलीला नेतृत्व दिले नसते, तर अजित पवारांनी बंडखोरी केलीच नसती. तसेच, नगरविकास खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे जाणार, अशी चर्चा उडाली होती. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि शिवसेच्या नेत्यांना चांगले स्थान दिले असते, तर शिंदे आणि शिवसेनेच्या नेत्यांनी बंड केले नसते.

त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी भाजपला धोका देऊन शरद पवारांशी हातमिळवणी केली. शरद पवार यांनी लबाडी केल्याने दोन्ही पक्ष प्रमुखांना धडा शिकवायला हवा, अशी भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची होती”, त्यामुळे फुटीचे बीज भाजपने पेरले नाही, असे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.

Karnataka Politics : प्रज्ज्वल रेवण्णा यांना ब्लू काेॅर्नर नोटीस बजावली जाऊ शकते?

लबाडीचे उत्तर चाणक्य नितीनेच

2019 मध्ये ठाकरे यांनी युतीमध्ये निवडणूक लढवली व दगाफटका केला. सर्वांसाठी माझे दरवाजे उघडे असल्याचे ठाकरे म्हणायचे. त्यांच्याकडे आम्ही गेलो नव्हतो, उलट तेच पाठिंब्यासाठी आले होते. 2014 मध्ये आम्ही न मागता शरद पवार यांनी पाठिंबा जाहीर केला होता. शिवसेना आणि भाजपाला एकमेकांपासून दूर ठेवण्यासाठी हा लबाड खेळ होता, असे त्यांनीच सांगितले आहे. 2017 व 2019 मध्ये पवार यांनी सरकार बनविण्यासाठी स्वतःहून प्रस्ताव दिला आणि नंतर विलंब लावून लबाडी केली.

आम्ही मैत्रीला जागलो व शिवसेनेसह तीन पक्षांचे सरकार बनविण्याची भूमिका घेतली. परंतू, 2017 मध्ये पवार यांनी शिवसेनेला सोबत घेण्यास विरोध केला होता. नंतर 2019 मध्ये भूमिका बदलून शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन केली, हे कुठल्या नैतिकतेत बसते? राजकीय लढाईत आम्हाला पराभूत केले, तर हरकत नाही. पण धोका आणि लबाडीला उत्तर चाणक्य नीतीनेच द्यावे लागते. त्यांना धडा शिकवून भाजपाने काहीही चुकीचे केले नाही. त्याचा आम्हाला प्रश्चात्तापही नाही. पक्ष वाढवा अशी आमची इच्छा आहे. सर्वांसाठीच आमचे दरवाजे उघडे आहेत, असे आशिष शेलार प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!