Assembly Election : विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. राज्यातील 288 मतदारसंघापैकी 230 पेक्षा अधिक मतदारसंघांवर त्यांचे आमदार निवडून आलेत. तर विरोधकांना विरोधी पक्षनेते पद देखील मिळवता आले नाही. याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि राहुल गांधी मारकडवाडी गावापासून ईव्हीएमच्या विरोधात एल्गार पुकारणार आहेत. त्याआधीच शरद पवार यांची पत्रकार परिषद पार पडली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी विधानसभा निवडणुकीतील कॅक्युलेशन मांडले.
‘शरद पवार गटाची विधानसभा निवडणुकीतील मतं 72 लाख आहेत. मात्र, आमचे उमेदवार 10 निवडून आलेत. अजित पवारांचे 58 लाख मतं आहेत, त्यांचे 41 उमेदवार निवडून आले आहेत. 80 लाख मतं मिळालेल्या पक्षाचे 15 तर 79 लाख मतं मिळालेल्या पक्षाचे 57 आमदार निवडून येतात. असं कॅलक्यूलेशन आहे, आम्ही याच्या खोलात गेलेलो नाही. जोपर्यंत आमच्याकडे आधार नाही, तोपर्यंत याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. मात्र, मतांचे आकडे आश्चर्यकारक आहेत’, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. ते कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते म्हणाले की, ‘चार निवडणुका आत्ताच झाल्या आहेत. हरियाणामध्ये मी स्वतः गेलो होतो. तिथे भाजपची अवस्था वाईट होती, पण तिथे भाजपा सत्तेवर आली. काश्मीरमध्ये निवडणूक झाली. तिथे फारूक अब्दुल्ला यांचा पक्ष आला. महाराष्ट्राची निवडणूक झाली. इथे भाजपला यश आले. मात्र झारखंडला मात्र त्यांचा पराभव झाला. त्यामुळे सत्ताधारी पक्ष सांगू शकतात की एका निवडणुकीत तुम्ही जिंकलात, एका निवडणुकीत आम्ही जिंकलो. ईव्हीएमचा काही संबंध नाही. मोठी राज्य आहेत. तिथे भाजप आहे आणि छोटी राज्ये आहेत. तिथे अनेक पक्ष आहेत.
Nitin Gadkari : गडकरींना आठवला सत्तरच्या दशकातील हॉलीवूड सिनेमा
मारकडवाडी इथं बंदी घालण्याचं कारण काय?
‘निवडणूक प्रक्रिया संपली आहे. मारकडवाडी इथं बंदी घालण्याचं कारण काय? त्या गावातील लोकांना पहायचं होतं की मतं कुणाला किती पडली. त्यामुळे आम्ही आता ठरवलं आहे की त्या गावातील लोकांचं काय म्हणणं आहे. आम्ही एकत्रपणे येणाऱ्या सर्व निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. पराभव झाला म्हणून नाराज व्हायचं नाही. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांचे म्हणणे आहे की महाविकास आघाडी सोबत पुढे जायचं. अबू आझमी यांचं वक्तव्य मी ऐकलं आहे,’ असंही पवार म्हणाले.