महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : सध्या तर वादळ थांबवले, पुढे काय ?

Maratha Reservation : शंभुराज देसाईंना मागितले होते दोन महिने, पण..

Manoj Jarange Patil : सध्या तर वादळ थांबवले, पुढे काय ?

Reservation Movement : गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचे ओएसडी मराठा समाजातील काही लोकांना घेऊन दिल्लीला जात आहेत. आरक्षण आंदोलनाला बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, असा आरोप जरांगे यांनी केला आहे. दरम्यान त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केले. तूर्तास हे उपोषण थांबवण्यात सरकारला यश आले. पण पुढे काय, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राद्वारे ओबीसीचा लाभ देण्याचा निर्णय सगेसोयऱ्यांनाही लागू करा, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे चौथ्यांदा आंदोलनाला बसले होते. पाचव्या दिवशीही आंदोलनावर ते ठाम होते. सरकारवर टीका करताना त्यांनी मुख्यमंत्र्यांसह फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. लोकसभा निवडणुकीनंतर मनोज जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले. सगेसोयरे संदर्भात काढलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा, या मागणीसाठी त्यांनी पुन्हा सरकारला धारेवर धरले.

काल 13 जून रोजी पाचव्या दिवशीही त्यांचं आंदोलन कायम होते. पण आज मंत्री शंभुराज देसाई यांनी त्यांचे उपोषण सोडवले. उपोषणादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मराठा समाजातील काही लोकांना घेऊन दिल्लीला जात आहेत. आरक्षण आंदोलनाला बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. दिल्लीतून काही मॅटर तयार करून आणू शकतील. परंतु समाज अशा प्रयत्नांना भीक घालणार नाही. सरकारने हे प्रकार थांबवले नाहीत तर या लोकांची नावे जाहीर करू, असेही ते म्हणाले होते. हाच ओएसडी 15-15 लाख वाटायला निघाला होता. तो कोण आहे, हे समाजाला माहीत असल्याचेही जरांगे म्हणाले.

फडणवीस यांच्यावरही आरोप..

मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून जे षडयंत्र रचले जात आहे, त्यात देवेंद्र फडणवीस यांची माणसे सहभागी आहेत. असा आरोपही जरांगे यांनी केला. मात्र आमचे कुणाशी वैर नसल्याचे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमुळेच आपल्याला ओबीसीतून सरसकट आरक्षणाचा लाभ मिळत नाही, असा समज मनोज जरांगे यांच्यासह मराठा समाजातील लोकांमध्ये आहे. त्यामुळे वेळोवेळी त्यांचा रोष भाजप व फडणवीसांविरोधात व्यक्त होतो आहे.

Manoj Jarange Ultimatum : ..तर विधानसभा निवडणुकीत उतरूच !

लोकसभा निवडणुकीतही महायुतीच्या उमेदवारांना पराभवास सामोरे जावे लागले. त्यामागेही प्रमुख कारण हे आंदोलनच होते. विधानसभेलाही त्याची पुनरावृत्ती होण्याचा इशारा दिला गेला आहे. मात्र सरकारला हा धोका पत्करायचा नसेल व समाजाचा राग शांत करायचा असेल, तर सरकार व निवडणुकीच्या नेतृत्वातून फडणवीस यांना तूर्त बाजूला करणे हाच भाजपसमोर पर्याय असेल. असेही जरांगे यांनी उपोषणादरम्यान म्हटले होते. सध्या जरांगेंनी एक महिन्याचा वेळ दिला आहे. या कालावधील ठोस कार्यवाही न झाल्यास सरकारला मोठी किंमत चुकवावी लागणार, असं दिसतंय.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!