महाराष्ट्र

Nana Patole : लोक रस्त्यावर उतरल्यावर सरकारला जाग

Congress : नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल; ‘महायुतीचे सरकार बेभान’

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने 23 ऑगस्टला धुळे जिल्हा दौऱ्यावर होते. दोंडाईचा येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी नाना पटोले यांनी राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला. बदलापूर, अकोला, कोल्हापूर या ठिकाणी झालेल्या अत्याचाराच्या घटनांवरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. ‘लोक रस्त्यावर आल्याशिवाय सरकारला जाग येत नाही. महायुतीचे सरकार बेभान सुटले आहे,’ अशी टीका त्यांनी केली.

महाराष्ट्र लहान मुलींसह तरुणी, महिला सुरक्षित नाहीत. अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गुन्हे दारखल होण्यासाठी खूप वेळ लागतो. जनता रस्त्यावर उतरते. तेव्हा या सरकारला जाग येते. ट्रिपल इंजिन सरकार असले तरीही पूर्णपणे अपयशी आहे, या शब्दांत पटोले यांनी निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रातील सरकार बेभान आहे. राज्यात प्रशासन राहिलेलं आहे का? महाराष्ट्रात आता कायद सुवेवस्था राहिलेली नाही. त्यामुळे कुणाचा धाक कुणालाही राहिलेला नाही. याच कारणामुळे नराधमांची हिंमत मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. म्हणूनच लोकांनी स्वयंस्फूर्तीने बदलापूर येथे आंदोलन केले. तिथे कुठेही राजकीय सहभाग नव्हता. ‘लाडकी बहीण नको, पण आमच्या मुलींना सुरक्षा द्या’ अशी आर्त हाक आंदोलनातील महिलांनी दिली. योजनेचे पैसे लोकांना नको आहेत. त्यांच्या मुली सुरक्षित राहाव्या, हीच त्यांची अपेक्षा आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

 सरकार दोष का मान्य करत नाही?

बदलापूरच्या घटनेबाबत नाना पटोले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बदलापूरच्या घटनेत लोकांनी हे आंदोलन अंगावर घेतले आहे. राज्य सरकारला धडा मिळावा म्हणून लोकांनी रस्ता रोको केले. हा जनतेचा रोष आहे. तुम्हाला सोडणार नाही, असेही ते म्हणाले. तसेच बदलापूरच्या घटनेमध्ये विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. हा विषय राजकारणाचा होऊच शकत नाही, हे राज्य सरकारला कळात नाही हा दोष त्यांचा आहे, अशी प्रतिक्रिया पटोलेंनी दिली.

एका आठवड्यात 12 घटना

आठवड्याभरात 12 अत्याचाराच्या घटना घडल्या. या विषयी तुम्ही प्रशासनाला कडक करायला हवे. परंतु सगळ्या नराधमांना मोकळे सोडण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण आपल्या हातात घेतलं आहे. काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी या निर्णयाचे स्वागत करतो, असेही नाना पटोले म्हणाले. बदलापूर प्रकरणात कारवाई करण्यासाठी विलंब केल्याप्रकरणी बदलापूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि दोन कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे. परंतु हे प्रकरण दडपण्यासाठी पोलीस निरीक्षकावर कुणाचा दबाव होता, याची सुध्दा चौकशी होण्याची आवश्यकता असल्याने ते म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!