Raver constituency : रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली. मतदार संघात ग्रामीण, शहरी भागामध्ये प्रचार सुरू आहे. त्यांच्यासाठी माजी मंत्री एकनाथ खडसे आदिवासी, दलित भागात मतदारांशी संपर्क साधत आहेत.
खडसे यांनी चोपडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे घनश्याम अग्रवाल यांच्या निवासस्थानी रविवारी सायंकाळी भेट दिली. भाजपा व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी सांगितले, मी आदिवासी क्षेत्रामध्ये बैठका घेतो आहे. प्रदेशाध्यक्षांनी मला सांगितल्यानुसार आदिवासी व दलित वस्तीमध्ये संपर्क सुरू आहे.
जयंत पाटील यांनी मोदी, अमित शाह यांच्या विषयीच्या वक्तव्यावर खडसे म्हणाले, जयंत पाटील राष्ट्रवादी पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यामुळे भाजपचे सरकार येईल असे म्हणणार नाहीत. त्यांना त्यांची प्रचाराची दिशा ठरवावी लागते. या निवडणुकीत रावेर मतदारसंघात रक्षा खडसे चांगल्या मताधिक्याने निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला.
Lok Sabha Election : मतदार स्लिप घरोघरी पोहचवताना वाहतात घामाच्या धारा
रक्षा खडसे ही सून नव्हे मुलगीच !
रावेर मतदारसंघात भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी अर्ज भरण्यापूर्वी सासरे एकनाथ खडसे यांचे आशीर्वाद घेतले होते. तेव्हा खडसे यांनी रक्षा सून नव्हे; मुलगीच आहे असे सांगितले. रक्षा खडसेंच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
रक्षा यांनी 10 वर्षांत लोकसभा सभागृहात व मतदारसंघात चांगले काम केले आहे. त्यांना मतदारसंघातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपला भाजप प्रवेश अद्याप झाला नसला, तरी भावी काळात भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत, असे स्पष्ट केले.