महाराष्ट्र

Maharashtra Assembly : मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ

Vidhan Sabha : मंत्री शंभूराजे देसाई यांची माहिती

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे राहत असलेल्या घरावर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे पाळत ठेवली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या घटनेनंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा विधानसभेत लावून धरला. अखेर आता मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती गुरुवारी (ता. 4) मंत्री शंभूराजे देसाई यांनी विधानसभेत दिली आहे. 

राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी आंदोलन उभारणारे मनोज जरांगे पाटील प्रकाशझोतात आले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सगेसोयऱ्यांच्या व्याख्येत बसणारे आणि ओबीसी प्रवर्गातून (OBC) आरक्षण देण्यासाठी पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले होते. सरकारी शिष्टमंडळाने सगेसोयऱ्यांच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 13 जुलैपर्यंतची मुदत देत उपोषण स्थगित केले होते.

मुदत संपण्याच्या मार्गावर

 

जरांगे यांनी दिलेली मुदत संपायला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. असे असतानाच मनोज जरांगे पाटील हे राहत असलेल्या घराभोवती ड्रोन फिरताना आढळला. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी स्वत: गच्चीवर जाऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी सहकाऱ्यांशी चर्चाही केली.

Maharashtra Assembly : अंबादास दानवें निलंबन कालावधी कपात

या प्रकाराबद्दल अंतरवाली सराटीचे सरपंच आणि ग्रामस्थांनी पोलिसांना तक्रार दिली होती. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली होती. यानंतर हा मुद्दा पावसाळी अधिवेशनातही मांडण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहाला याबाबत माहिती दिली.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज मनोज जरांगे पाटील यांच्या घरावर ड्रोन टेहळणी करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका आहे का? अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं. मराठा आंदोलनामुळे अंतरवली सराटी हे गाव केंद्रस्थानी आलेलं आहे. त्यामुळे या प्रकारामागे नेमकं कोण आहे? हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली होती. आंदोलनामुळे हे टेहळणी होत असेल तर हे गंभीर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून निवेदन सादर करण्याची मागणीही त्यांनी केली. आता याप्रकरणी सरकारकडून जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

सुरक्षेत वाढ केल्याची माहिती!

गृहराज्यमंत्री (State Minister for Homes) शंभुराज देसाई यांनी जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याची माहिती दिली. त्यांनी शुक्रवारी (ता.4) रोजी विधानसभेत याबाबत निवेदन केले. याप्रकरणी पोलिस अधीक्षकांनी अहवाल दिला आहे.

Cricket World Cup : गुजरातची बस बोलावणे महाराष्ट्राचा अपमानच

रात्रीचे ड्रोन सर्वेक्षण झाले आहे. त्याचे तीन पथकामार्फत चौकशी करण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांची सुरक्षा वाढवली आहे. चार पोलिस आणि एक पोलिस वाहन जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत तैनात राहतील, अशी माहिती शंभुराजे देसाई यांनी दिली.

वाघमारेंचे विधान चर्चेत

ड्रोन कॅमेराचा खोडसाळपणा जरांगेच्याच लोकांनी केला असेल. ड्रोन दिशाभूल करुन पदरात काहीतरी पाडून घेण्याचा प्रोग्राम असू शकतो, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी दिली. जरांगेंना भीती वाटत असेल तर त्यांनी संरक्षण घेतले पाहिजे. आमचा त्याला विरोध नाही, असेही वाघमारे यांनी म्हटले. शरद पवार (Shrad Pawar) यांनी आरक्षणाबाबत आपली नक्की भूमिका काय आहे, हे जाहीर करण्याचं आवाहनही त्यांनी केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!