महाराष्ट्र

Assembly Election : दोन जागांसाठी काँग्रेसचे आमदार मुंबईत!

Congress : दक्षिण, पूर्व नागपूर मित्रपक्षांना का? थेट प्रदेशाध्यक्षांना सवाल

Nagpur constituency : दक्षिण नागपूरवरून महाविकासआघाडीचे जागावाटप रखडले आहे. आता पूर्व नागपुरबाबतदेखील विविध चर्चांना उधाण आले आहे. या दोन्ही मतदारसंघांत उद्धव ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवार उभा करण्याची भूमिका घेतली आहे. यावरून काँग्रेसमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यासाठी कॉंग्रेसच्या नागपुरातील दोन आमदारांनी थेट मुंबई गाठले आहे. प्रदेशाध्यक्षांनाच याबाबत सवाल केला आहे. या दोन्ही मतदारसंघांत काँग्रेसच भाजपला टक्कर देऊ शकते, असा दावा या आमदारांनी केला आहे.

दक्षिण व पूर्व नागपुरात मागील दोन निवडणूकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता. महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे गटाने दक्षिण नागपूरवर दावा केला आहे. तर राष्ट्रवादीकडून दुनेश्वर पेठे यांचे नाव उमेदवारीसाठी समोर केले जात आहे. मात्र ही बाब काँग्रेस नेत्यांनी प्रतिष्ठेची बनवली आहे. त्यामुळेच आमदार विकास ठाकरे आणि आमदार अभिजित वंजारी यांच्यासह कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई गाठले.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, सरचिटणीस मुकूल वासनिक यांची भेट घेतली. पूर्व नागपुरात गेल्यावेळी मताधिक्य घटविण्यात यश आले होते. तर दक्षिणमध्ये काँग्रेसचा निसटता पराभव झाला होता. पूर्ण ताकदीने यंदा लढले तर दोन्ही ठिकाणी काँग्रेस करिष्मा घडवू शकते, अशी भूमिका शहरातील नेत्यांनी मांडली.

या दोन्ही जागा गेल्या तर कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम होईल. त्याचा फटका पूर्व विदर्भातील इतर जागांवर बसू शकतो, अशी भितीदेखील यावेळी व्यक्त करण्यात आली. आता काँग्रेसचे मोठे नेते जागांच्या वाटाघाटीत नागपुरातील सहाही जागा मिळविण्यात यशस्वी होतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Nagpur : महाविकास आघाडीत बंडखोरीचे संकेत?

अख्ख्या नागपूरवर काँग्रेसचा दावा

नागपुरातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये आजपर्यंत काँग्रेसच लढत किंवा जिंकत आली आहे. आजही सहापैकी दोन जागांवर काँग्रेसचेच आमदार आहेत. इतर ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचाच उमेदवार राहिला आहे. दुसऱ्या क्रमांकावरही अत्यंत कमी फरकाने काँग्रेसचा पराभव झालेला आहे. अशात महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना उमेदवारी देण्याचा प्रश्न येतोच कुठून, असा सवाल या दोन्ही आमदारांनी केल्याचे समजते. सर्व सहा मतदारसंघांमध्ये भाजपच्या विरोधात काँग्रेसच लढेल, अशी स्पष्ट भूमिका या बैठकीत काँग्रेस आमदारांनी घेतली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!