महाराष्ट्र

Bhandara Gondia : ठरलं… पहिल्याच अधिवेशात डॉ. पडोळे उचलणार ‘हा’ मुद्दा

Prashant Padole : नवनिर्वाचित खासदारांचा संकल्प : ‘द लोकहित’शी खास बातचीत

Political News : मंत्रीमंडळ गठीत झाल्यानंतर आता संसदेचे पहिले अधिवेशन लवकरच होणार आहे. त्यामुळे पहिल्याच अधिवेशनात कुठले प्रश्न मांडून निर्वाचन क्षेत्रातील जनतेला खूश करायचे याची तयारी खासदार करताना दिसत आहेत. संसदेच्या पहिल्या अधिवेशनाच्या अनुषंगाने भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनीही काही संकल्प करून ठेवलेत. त्यांनी त्यांचे संकल्प आता जनतेपुढे व्यक्त केले आहेत. धान उत्पादक जिल्हे, तलावांचे जिल्हे अशी ख्याती असलेल्या भंडारा-गोंदिया जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणारे डॉ. प्रशांत पडोळे यांनी ‘द लोकहित’शी खास बातचीत केली. यात त्यांनी त्यांच्या आगामी योजना आणि मुद्दे देखील मांडले.

भंडारा- गोंदिया लोकसभा मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय सामोर ठेवले आहे. धान उत्पादक जिल्हे अशी देशात ख्याती असलेल्या भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केवळ समर्थन मूल्य वाढवून होणार नाही. या शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी धानपिकांवर आधारित प्रक्रिया उद्योग आणण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी जीएसटीमुक्त शेती धोरणाचा मुद्दा संसदेत मांडणार, मासेमारी व्यवसायाला चालना देणार, असा विश्वास खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी ‘द लोकहित’शी बोलताना व्यक्त केला.

अधिवेशनात धानाचा मुद्दा मांडणार

पक्षात अनेक इच्छूक असतानाही पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी दिली. 25 दिवस कार्यकर्ते एकजुटीने अविश्रांत लढले. त्याचे रूपांतर विजयात झाले. त्यामुळे ही निवडणूक खऱ्या अर्थाने जनतेने जनतेसाठी लढल्याचे दिसून आले. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता मनापासून लढल्यामुळे हा विजय मिळाला, अशी कृतज्ञ भावना खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी व्यक्त केली. निवडून आल्यानंतर लोकशाहीचे पवित्र मंदिर ‘संसद भवन’ मधून परतल्यानंतर मतदारसंघात भेट देऊन समस्या जाणून घेत आहे. अधिकाऱ्यांशी चर्चा करून विषय समजून घेत आहे. मी जे काही करेन, ते जनतेसाठीच करेन, असा विश्वास देऊन पहिल्या अधिवेशनात धानाचा मुद्दा मांडणार असल्याचे स्पष्ट केले

Atishi Marlena : दिल्लीत पाणी प्रश्नावरून ‘आप’ आक्रमक

धान उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी संकटांना सामोरे जावे लागते. कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ. त्यामुळे या शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी धान शेतीसोबत जोडधंदा, दुग्ध व्यवसासाठी गोपालनाचे जाळे निर्माण करणे, त्यातून दुधाचे उत्पादन वाढविणे, त्यानंतर दुधावर आधारित लहानमोठे उद्योग वाढवून आपल्या भागातील शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच शेतकरी आणि पशुपालकांसाठी काही तरतुदी करू, असे देखील त्यांनी सांगितले. वैनगंगा नदीच्या जलपर्यटनामुळे भंडारा जिल्ह्याचे नाव देशात होण्याची क्षमता आहे. त्यामुळे जलपर्यटनाच्या माध्यमातून केंद्र शासनाचा निधी आणून जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ बनविण्यासाठी कटीबद्ध आहे. याशिवाय नवीन उद्योगांची पायाभरणी करून मतदारसंघातील तरूणांच्या हाताला काम देण्याचा मानसही डॉ. पडोळे यांनी बोलून दाखविला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!