महाराष्ट्र

Mumbai : सोमय्या पिता-पुत्र अडचणीत; विक्रांत आयएनएस प्रकरण

High Court : पोलिसांचा ‘क्लोजर रिपोर्ट’ न्यायालयाने फेटाळला

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांत प्रकरणी गंभीर आरोप केले होते. त्यांच्या आरोपांनंतर किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र मुंबई पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात नुकताच ‘क्लोजर रिपोर्ट’ सादर केला. प्रकरण बंद करण्याची मागणी केली. न्यायालयाने मात्र या रिपोर्टवर ताशेरे ओढत मुंबईकरांकडून गोळा केलेले पैसे पुठे गेले? असा सवाल केला आहे.

भारतीय नौदलाची भंगारात काढलेली युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’ वाचवण्याच्या नावाखाली कोट्यवधीचा निधी गोळा करून त्या पैशांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या व मुलगा नील यांच्यावर आहे. आता हे दोघे चांगलेच गोत्यात आले आहेत. सोमय्या पिता-पुत्रांनी ‘विक्रांत’च्या नावावर गोळा केलेल्या 57 कोटी रुपयांचे काय झाले, याची सखोल चौकशी करा, असे स्पष्ट आदेश मुंबई पोलिसांना दिला. आणि दंडाधिकारी न्यायालयाने ‘क्लोजर रिपोर्ट’ फेटाळून लावला आहे.

पोलीस म्हणतात गैरसमजुतीने तक्रार

माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरून एप्रिल 2022 मध्ये सोमय्या पिता-पुत्रांविरुद्ध ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर या घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला होता. मात्र तक्रारदाराने गैरसमजुतीने तक्रार केली, असा अजब दावा करीत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात ‘क्लोजर रिपोर्ट’ दाखल केला होता. हा रिपोर्ट अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. पी. शिंदे यांनी नुकताच फेटाळला. याचवेळी पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढत किरीट सोमय्या व नील सोमय्या या आरोपी पिता-पुत्राची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे सोमय्या पिता-पुत्राला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना मोठा दणका बसला आहे.

तक्रारकर्त्याने दिले होते २ हजार रुपये

किरीट सोमय्या, नील सोमय्या व इतर आरोपींनी मुंबईत जागोजागी ‘डोनेशन बॉक्स’ लावून लोकांकडून पैसे उकळले, असा आरोप करीत माजी सैनिक बबन भोसले यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. यावरून कलम 420, 406, 34 अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. भोसले यांनी स्वतः 2000 रुपये दिले होते, मात्र युद्धनौका भंगारात निघाली. मात्र मोठ्या घडामोडीनंतर ही तक्रार मागे घेण्यात आली होती.

मुंबईकरांकडून गोळा केलेले पैसे गेले कुठे?

आरोपी सोमय्या पिता-पुत्राने मुंबईकरांकडून कोट्यवधी रुपये गोळा केल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. तरीही घोटाळा झाला नसल्याचा पोलिसांचा दावा असेल तर मग सोमय्या पिता-पुत्राने गोळा केलेले पैसे गेले पुठे? ते पैसे राज्यपालांचे कार्यालय किंवा सरकारकडे जमा केल्याचा एकही पुरावा का सादर केला नाही? असे सवाल करीत न्यायालयाने पोलिसांचे कान उपटले. तसेच घोटाळ्याच्या तपासातील गंभीर त्रुटींवर बोट ठेवले आहे. या प्रकरणातील पुरावे तसेच वस्तुस्थितीचा विचार करता युद्धनौकेच्या मदतनिधी घोटाळ्याची सखोल चौकशी आवश्यकच आहे. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांनी या घोटाळ्याचा अधिक तपास करून अहवाल सादर करावा, असे आदेश अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला दिले आहेत.

‘क्लोजर रिपोर्ट’वर ताशेरे

आरोपींनी चर्चगेट रेल्वे स्टेशनसह अनेक ठिकाणी लोकांकडून पैसे गोळा केले. पण पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पैसे दिलेल्या लोकांचे जबाब नोंदवण्यासाठी कुठलीही तसदी घेतलेली दिसत नाही. पोलिसांनी 38 लोकांचे साक्षीदार म्हणून जबाब नोंदवले. त्यातील अनेकांनी मदतनिधी म्हणून दिलेले पैसे कुठे गेले याची कल्पना आपल्याला नसल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यामुळे अधिक तपास आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!