महाराष्ट्र

Sanjay Raut : वायकरांच्या मेहूण्याने वापरलेला मोबाईल पोलीस ठाण्यातून गायब

Lok Sabha Result : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निकालावरून दावा

Political war : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना झाला. निकालानंतर मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निकालावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खळबळजनक ट्विट करीत काही दावे केले आहेत. राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये देशातल्या निवडणूक घोटाळ्यातील हा एक आदर्श घोटाळा आहे, असे म्हटले आहे.

त्यांनी निवडणूक यंत्रणा हातात घेतली आहे. ज्या-ज्या ठिकाणी पराभव दिसत होता, त्या त्या ठिकाणी छेडछाड करण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे रविंद्र वायकर यांना विजयी करणारा मोबाईल फोन पोलीस ठाण्यातून गायब करण्यात आला, असा दावा करत त्यांनी वनराई पोलीस ठाण्याचे पीआय राजभर हे अचानक रजेवर का गेले? असा प्रश्न उपस्थित करीत गंभीर आरोप केले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या निकालात मुंबई मधील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निकालाचा ट्विस्ट वाढतच आहे. नवनवे दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांनी ईव्हीएम वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र तरीही या प्रकरणी विरोधकांकडून आरोप करण्यात येत आहेत. खासदार संजय राऊत यांनी 17 जून रोजी केलेल्या ट्विटमध्ये काही गंभीर आरोपाचे दावे केले आहेत.

राऊत यांनी, वनराई पोलीस ठाण्याचे पीआय राजभर हे अचानक रजेवर का गेले? वायकर यांना विजयी करणारा मोबाईल फोन पोलीस ठाण्यातून बदलण्याचा प्रयत्न झाला. रवींद्र वायकर यांचा खास माणूस, निवृत्त पीआय सातारकर हे वनराई पोलीस ठाण्यात चार दिवसांपासून काय डील करत होते? असे प्रश्न राऊत यांनी उपस्थित केले आहेत. तसेच वनराई पोलीस ठाण्याचे सीसीटीव्ही फुटेज लगेच जप्त करुन चौकशी करावी, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे.

राऊत यांचा लॅबवरही आक्षेप!

राऊत यांनी ट्विटमध्ये, रविंद्र वायकर यांचा विजय खरा नाही असा दावा केला आहे. वादग्रस्त फोन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्याचे मी ऐकले. पण पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात बेवड्या आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलून क्लीनचीट देणारे हेच लॅबवाले आहेत. रक्तचाचणी करणारे या लॅब गृहखात्याच्या अंतर्गत येतात, असा मोठा आरोप संजय राऊत यांनी केला.

Nana Patole : मोदी असूनही हैराण, स्वतः राहतील तेव्हा काय?

निवडणूक अधिकाऱ्यावरही आरोप

मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर करणाऱ्या निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्यावरही राऊत यांनी मोठा आरोप केला आहे. सूर्यवंशी यांचा वायकर यांना विजयी करण्यामध्ये मोठा हात आहे. ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, असे अब्जाधीश एलॉन मस्क सांगत आहेत. निवडणूक अधिकाऱ्याचा पूर्वेतिहास जाणून घ्यावा. वंदना सूर्यवंशी यांचा मोबाइल सुद्धा जप्त करावा, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!