महाराष्ट्र

Yavatmal : शेतकऱ्यांसाठी लढणारा संदीप धुर्वे दिसला नाही का?

Sandip Dhurve : डान्सचा व्हिडियो व्हायरल झाल्यावर आमदाराचा सवाल

यवतमाळच्या आर्णी केळापूर विधानसभेचे भाजप आमदार संदीप धुर्वे यांनी उमरखेड येथील एका दहीहंडी कार्यक्रमात नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्यासोबत डान्स केला. या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यानंतर संदीप धुर्वे यांच्यावर विरोधी पक्षाकडून जोरादार टीका होत आहे. याबाबत आता संदीप धुर्वे यांनी भाष्य केलं आहे. नाचणारा संदीप धुर्वे दिसला, पण शेतकऱ्यांसाठी लढणारा दिसला नाही का? असा सवाल त्यांनी विरोधकांना केला आहे.

ते यवतमाळमध्ये बोलत होते. ‘मी देवेंद्र फडणवीसांना विनंती केली, भाऊ आमचा ग्रामीण भाग आहे. आदिवासी बहुल भाग आहे. कित्येक लोकांजवळ अँड्रॉईड मोबाईल नसतो. त्यामुळे अनुदानापासून लोक वंचित राहतील. देवेंद्रजींनी आमचं ऐकलं आणि जीआर काढला. त्यानंतर जाचक अटी रद्द झाल्या. हे काम संदीप धुर्वेने केले. तीन दिवस मुसळधार पाऊस होता. पहिल्याच दिवशी तिन्ही तहसीलदारांना कितीही पाऊस असो पंचनामे करा आणि शेतकऱ्यांना न्याय द्या, असा आदेश काढणारा संदीप धुर्वेच आहे,’ असं ते म्हणाले.

धरले धारेवर

विरोधकांचं विरोध करणे काम आहे. ठाकरे गट आणि काँग्रेस सरकारने त्यांच्या कार्यकाळात दहीहंडीवर बंदी घातली होती. हिंदूंच्या सणांवर बंदी घातली होती. ते आम्हाला काय शिकवणार? तिथे जनसमुदाय होता, तरुणाई होती. तिथल्या सर्व आयोजकांनी मला विनंती केली की, भाऊ आपण ठेका धरावा. आपण थोडं नाचावं. उत्तेजन दिल्यामुळे लोक खूश होतील. लोकांना, आयोजकांना, जनतेला खूश करण्यासाठी मी ठेका धरला. गौतमी पाटील या महाराष्ट्रातील नावाजलेल्या डान्सर आहेत. त्यांनाही मोह आवरला नाही. त्यांनीही माझ्यासोबत ठेका धरला. त्यात वाईट काय आहे? दहिहंडी हिंदूंचा सण आहे. आम्ही साजरा केला. उरला शेतकऱ्यांचा प्रश्न, तर यवतमाळमधील शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देणारा संदीप धुर्वेच आहे, हे वडेट्टीवारांनी ध्यानात ठेवावं.

4 सप्टेंबरला उमरखेड इथे दहीहंडीचा उत्सव होता. याच कार्यक्रमातील भाजपचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांचा गौतमी पाटील सोबतचा डान्स चांगलाच वायरल झालाय. यावेळी दोघांनी एकत्र डान्स केला. दरम्यान, याबाबत बोलताना संदीप धुर्वे म्हणाले, ‘टीका करणं विरोधकाचं कामच आहेत. माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आग्रह होता की, आमची सर्व तरूण मुले आहेत. जमाव अतिशय मोठा होता. गौतमी पाटील या खूप फेमस आहेत. कोणासोबत नाचत नाही. मात्र ती माझ्या सोबत नाचली, असंही धुर्वे म्हणाले.

शेतकऱ्यांना पीक विमा साठी बैठक लावून एक लाख 98 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळून दिला. इ-पीक पाहणीची अट रद्द केली. नुकसानाचे पहिले पंचनामे करण्याचे निर्देश दिले. विरोधी पक्ष फक्त राजकारण करत आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!