देश / विदेश

BJP Politics : भाजप नेत्याचा आरोप, हा मृत्यू नसून हत्या आहे

Tamil Nadu : विरोधी पक्षांच्या फायद्याचा मुद्दा

BJP On Congress : तामिळनाडू मध्ये विषारी दारूचे सेवन केल्याने 50 लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवरून भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षावर टीका केली आहे. भाजपचे खासदार संबित पात्रा यांनी काँग्रेसच्या नेत्यांच्या मौनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. आरोप करताना ते बोलले एवढ्या मोठ्या प्रकरणानंतर मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या सर्व नेत्यांचे मौन आश्चर्यकारक आहे. भाजप नेते संबित पात्रा प्रसार माध्यमांशी बोलत होते.

https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35

देशात 32 पेक्षा जास्त दलितांचे मृत्यू झाले असल्यास, मृत्यू नसून हत्या असल्याचे मी मानतो असा आरोप संबित पात्रा यांनी केला. या प्रकरणात सर्व पक्ष गप्प आहेत कारण, हे प्रकरण आणि मुद्दा विरोधी पक्षाच्या राजकीय फायद्यासाठी आहे. तामिळनाडूच्या कल्लाकुरिची जिल्ह्यातील विषारी दारू पिल्याने 53 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 193 लोक रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कशामुळे झाला मृत्यू?

193 लोकांपैकी 140 लोकांची प्रकृती सध्या स्थिर आहे. राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी पत्रकारांना माहिती दिली. स्थानिकरित्या तयार केलेल्या दारूमध्ये भेसळ मेथनॉल जास्त प्रमाणात मिसळला गेला होता. ज्यामुळे काही तासांतच 37 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर हळूहळू उपचारादरम्यान आणखी लोकांचा मृत्यू झाला.

मेथनॉल हा एक जहरीला पदार्थ आहे. ज्याचा उपयोग दारू तयार करण्यासाठी केला जातो. यामुळे यकृताचे नुकसान, मूत्रपिंडावर परिणाम आणि डोळ्यांची दृष्टी कमी होण्याचा धोका असतो. एवढेच नव्हे तर त्याचे प्रमाण जास्त असल्यास एखाद्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो.

Sanjay Raut : आघाडीत बिघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादीचा कामात भोपळा

कल्लाकुरिची दारू प्रकरणाची चौकशी मद्रास उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांनी केली आहे. त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीसंबंधित कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे.

कडक आदेश देण्यात आले..

उच्च न्यायालयाने या प्रकरणात राज्य सरकारवर टीका केली आहे. तसेच राज्यात अवैध दारू विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाईवर एक विस्तृत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. हे निर्देश अन्नाद्रमुकच्या कायदेशीर शाखेचे सचिव आई एस इनबादुरई यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान दिले आहेत. कोर्टात या प्रकरणाची सुनावणी 26 जून रोजी होईल.

error: Content is protected !!