Shiv Sena : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड संभाजी महाराजांच्या जयंती मिरवणुकीत लाठीकाठी खेळताना दिसले. मिरवणुकीचा आकर्षण केंद्र झाले. अन्यथा वादग्रस्त विधाने त्यांची पाठ सोडत नाहीत.
छत्रपती संभाजी महाराजांची जयंती काल बुलढाण्यात मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. त्यात राजे महाराजांच्या काळातील थरारक कला सादर करण्यात आल्या. शिवकालिन दांडपट्टा, तलवारबाजी, लाठी काठी यांचा समावेश होता. आमदार संजय गायकवाड सुद्धा लाठीकाठी खेळले. तर आमदार पुत्र मृत्युंजय गायकवाड यांनी केलेल्या तलवारबाजीने सर्वांचीच मने जिंकली.
Vijay wadettiwar : सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेला 18 निष्पाप लोकांचा बळी
दरवर्षी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. प्रतिवर्षं नवनवीन देखावे सादर केले जातात.14 मे ला जन्मोत्सव सोहळ्यात इतर राज्यातील लोककलावंतांना बोलवण्यात आले होते. क्रीडापटू व पैलवान असलेले आ.संजय गायकवाड धर्मवीर आखाडा चालवतात. त्यांच्या मार्गदर्शनात अनेक तरुण-तरुणींनी लाठी, तलवारबाजी,मल्लखांबचे प्रशिक्षण घेतलेले आहे. अत्यंत उत्साहाने जयंती साजरी करण्यात आली.
बुलढाणा शहरातील मिरवणूक बघायला स्थानिक तसेच जवळपासचे लोक येतात. आणि शिवछत्रपतींच्या छाव्याला मानाचा मुजरा करतात. काल देखील लोकांनी गर्दी केली होती.