Maratha Reservation : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले आहे. सांगली (Sangli) येथे बोलताना भिडे यांनी पत्रकार परिषदेत मराठा समाजाला जागृत होण्याचे आवाहन केले. भिडे म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात मोठी चर्चा होत आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे. मराठ्यांनी आरक्षण मागावे का, असेही ते म्हणाले.
सांगलीतील कमांडो ट्रेनिंग कॅम्पचा उल्लेख भिडे यांनी केला. ट्रेनिंग कॅम्पमध्ये निःशुल्क प्रवेश दिला तर वाघ आणि सिंहानी तिथे प्रवेश घ्यावा का, असा प्रश्न त्यांनी केला. विमान उडविण्याच्या प्रशिक्षणासाठी गरुड प्रवेश घेतील का? स्विमिंग क्लबमध्ये मासळी प्रवेश घेईल का? अगदी तसेच मराठ्यांनी आरक्षण मागावे का, असे भिडे म्हणाले. मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे. आरक्षण काय मागता, असे स्फूरण त्यांनी चढवले. सिंहानी जंगल सांभाळायचे असते. मराठा शिंह आहे. मराठा जात ही संबंध देशाचा संसार चालविणारी जात आहे. मराठा समाजाने हे लक्षात घ्यावे, असे भिडे म्हणाले.
जागे होण्याचे आवाहन
संभाजी भिडे यांनी मराठा समजाला जागे होण्याचे आवाहन केले. आपली शक्ती ओळखण्याचे आवाहन केले. मराठ्यांच्या ज्या दिवशी लक्षात येईल, त्यादिवशी या मातृभूमीचे भाग्य उजळून जाईल. मराठा समाजाला ही शक्ती लक्षात येत नाही. हे आपले दुर्दैव आहे, असेही संभाजी भिडे यांनी सांगितले. बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत. या पार्श्वभूमीवर 25 ऑगस्ट रोजी संबंध सांगली जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे हा बंद पुकारण्यात आला आहे. बांगलादेशमध्ये जो अत्याचार सुरू आहे, त्याविरोधात भारत सरकारने कडक पाऊले उचलावी, अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली.
पाकिस्तानचा अविभाज्य भाग म्हणून बांगलादेशचा जन्म झाला. बांगलादेशच्या पंतप्रधान आज हिंदूस्थानकडे आश्रयाला आल्या. पंतप्रधान भारतात आल्यावर बांगलादेशमध्ये प्रतिक्रिया उमटल्या. हिंदूंवर अत्याचार होत आहेत. बांगलादेशमधील हिंदू लोकांचे अजिबात स्थलांतर नको. त्यांना बांगलादेशमध्येच सुरक्षा मिळायली हवी. सर्व हिंदू राजकारणी या गोष्टी घडल्यावर पेठून उठायला हवे, असे भिडे म्हणाले.
रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याबबाबत संभाजी भिडे यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री यांची जी भूमिका आहे तीच आमची आमची भूमिका आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काही गोष्टीवर बोलत नाहीत. देशात बलात्कार प्रकार हा किळसवाणा झाला. हे अत्याचार थांबायला हवे. कोणत्याही स्त्रीवरचा बलात्कार म्हणजे मातेवर बलात्कार आहे. हे संतापजनक आहे, असे भिडे म्हणाले. संभाजी भिडे यांनी पत्रकारांशी बोलताना कुशल, हिंमतवान, देशभक्त अशी विशेषणांचा वापर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जरी चांगली आहे. केवळ महिलांना मानधन देऊन नव्हे, तर त्यांच्या केसाला धक्का लागणार नाही याचीही व्यवस्था राज्य सरकारने करावी, असे संभाजी भिडे म्हणाले.