Political War ; नरेंद्र मोदी 9 जुन रविवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनात पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. अशात, शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सुरू असतानाच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी “अटकी हुई वो तो कोई ‘सरकार’ नहीं”..असे संबोधून टोला लगावला आहे.
नेमके काय म्हणाले यादव..
अखिलेश यादव यांनी X वर पोस्ट करीत म्हणाले की, ऊपर से जुड़ा कोई तार नहीं, नीचे कोई आधार नहीं, अधर में जो है अटकी हुई वो तो कोई ‘सरकार’ नहीं असे म्हणत खोचक शब्दात भ पोस्ट आहे.
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. येथे समाजवादी पार्टीनेने 37 जागा जिंकल्या आहेत, तर भाजपने 33 जागा जिंकल्या आहेत. याशिवाय काँग्रेसला सहा जागा, आरएलडीला दोन, अपना दल (एस) एक जागा आणि आझाद समाज पक्षाला (कांशीराम) एक जागा मिळाली आहे. तर बहुजन समाज पक्षाचे खातेही उघडलेले नाही.
यूपीमध्ये समाजवादी पक्षाच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांचा आत्मविश्वास वाढला आहे. अशात ते प्रत्येक वेळी भाजपवर निशाणा साधत आहेत.
या अगोदर पण झाला होता शायराना अंदाज..
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील त्यांच्या हँडलवरून एका पोस्टमध्ये लिहिले होते. भाजपने सामाजिक सलोखा बिघडवला आहे. देशातील बंधुभाव संपविला आहे. जातीविरुद्ध जात, पंथांना पंथांशी भिडवून भावना भडकवल्या आहेत. महिलांवर अत्याचार करणाऱ्या, शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्या लोकांना मंत्रीपदे दिली. ती कायम ठेवली, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला होता.