महाराष्ट्र

Maharashtra Lok Sabha Election : सलमानचे दबंग स्टाईल आव्हान “या” सेलिब्रिटींनी केले मतदान

 Voting Update : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान..

Voting Update : देशभरात आज पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले.आज महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच एकूण 13 मतदारसंघात मतदान.आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. नागरिकांनी मतदान करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांसोबतच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मतदान केले आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, जान्हवी कपूर, फरहान अख्तरने, शाहरुख खान सलमान खान यांनी मतदान केले आहे. नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे यासाठी कलाकारांनी आवाहन केले आहे.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या 13 जागांसाठी सोमवारी 20 मे रोजी मतदान पार पडले. अनेक हिंदी चित्रपटसृष्टीतील सेलेब्रिटी मुंबईतील मतदान केंद्रांवर दाखल झाले मतदानाचा हक्क बजावला

अभिनेता शाहरुख खान अक्षय कुमारने बजावला हक्क

शाहरुख खान त्याने बोटाला शाई लागण्याआधी आपल्या चाहत्यांना आणि मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केले आहे. मतदान करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाच कर्तव्य आहे, म्हणत शाहरुखने चाहत्यांना मतदान करण्याचे आवाहन दिले

दबंग स्टाईल मध्ये आवाहन

सलमान खानने सर्व नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले. ‘काहीही झाले तरी मी वर्षातले 365 दिवस व्यायाम करतो आणि आता काहीही झाले तरी आज मी मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यामुळे तुम्हाला हवे ते करा,पण आधी जाऊन मतदान करा. दबंग स्टाईल मध्ये ते बोलले

सकाळी उठून वर्क आऊट आणि आपल्या शूटिंगच्या शेड्युल्डसाठी ओळखला जाणारा अभिनेता अक्षय कुमारनेही जुहू येथील मतदान केंद्रावर मतदानाचा अधिकार बजावला. बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार याने आपला मतदानाचा अधिकार बजावला. भारताचे नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच मतदान केले आहे.

जान्हवी कपूर,अभिनेता राजकुमार रावने हक्क बजावला

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर हिनेही सकाळी मतदानाचे कर्तव्य पार पडले. सर्व लोकांना घराबाहेर पडून मतदान करावे असं आवाहन तिने केले.मतदान केल्या नंतर बॉलीवूड अभिनेता राजकुमार रावने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले आपली सर्वांची देशाप्रती मोठी जबाबदारी आहे, आपण मतदान केलं पाहिजे. आमच्या माध्यमातून जर लोकांवर प्रभाव टाकता येत असेल तर मतदानाचे महत्त्व लोकांना जागृत करणं हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आयकॉन म्हणून माझी निवड केल्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे. असे त्यांनी नमूद केले

अनिल अंबानी रांगेत..

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रिलायन्सचे अनिल अंबानीसुद्धा सकाळीच बाहेर पडले. सकाळी 6.54 वाजताच्या सुमारास मतदान सुरु होण्यापूर्वी ते रांगेत उभे होते. कुलाबा मतदान केंद्राबाहेर मतदान सुरु होण्याची ते वाट बघत होते.अभिनेता दिग्दर्शक फरहान अख्तर याने त्याची बहीण व दिग्दर्शिका झोया अख्तर तसेच आईसोबत जाऊन मतदानाचा अधिकार बजावला.अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनंही मतदानाचा हक्क बजावण्याचा सल्ला दिला

 

ऋतिक रोशन,शिल्पा शेट्टीची खास पोस्ट..

मी भारत आहे, भारत माझ्यात आहे. मी ताकद आहे, माझ्यात ताकद आहे. लोकशाहीसाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. मी मतदान करणार, तुम्हीही करा.मतदान करणे हा तुमचा हक्क आहे, त्यामुळे प्रत्येक मुंबईकर मतदारांनी मतदान करण्याचा आपला हक्क बजावावा. लोकशाही मजबूत करावी. खास पोस्ट करून मतदान केले

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!