महाराष्ट्र

Maharashtra : लोकसभेत एकही जागा न लढविणाऱ्या रिपाइंची ‘डिमांड’

Ramdas Athawale : महाविकास आघाडीने केले जनतेला ‘ब्लॅकमेल’

RPI News : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी समाप्त झाली आहे. सर्व पक्षांनी आता विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. लोकसभेत आलेल्या अपयशाचे दुःख विसरून महायुतीने देखील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. अशात, मागील निवडणुकीपेक्षा यंदा अधिक जागा मिळाव्या अशी मागणी महायुतीमधील घटकपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (RPI) महायुतीकडे केली आहे.

काही दिवसांपूर्वी आमची महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जागा वाटपाबाबत चर्चा झाली. त्यावेळी आम्ही फडणवीसांना म्हणालो की, लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha) आमच्या आरपीआय पक्षाला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला आठ ते दहा जागा हव्या आहेत. भाजपाबरोबर महायुतीत अनेक मित्र पक्ष आहेत, हे आम्हाला ठाऊक आहे. परंतु, आमची आठ ते दहा जागांची मागणी आहे. असे आरपीआयचे (आठवले गट) प्रमुख रामदास आठवले म्हणाले.

Gondia Politics : विरोधक एकत्र आले पण तिकीट कुणाला

अपेक्षेत वाढ

लोकसभा निवडणुकीत आरपीआय पक्षाला उमेदवारी मिळाली नाही. तसा हट्टही आम्ही धरला नाही. पण विधानसभेच्या (Maharashtra Assembly Election) काही जागा लढावायच्या. त्या निवडून आणायच्या, असा आमचा निर्धार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयश आलं असलं तरी त्याची अन्य काही कारणे आहेत. महाविकास आघाडीतल्या लोकांनी आणि नेत्यांनी जनतेला ब्लॅकमेल केले आहे. संविधान बदलणार अशी अफवा पसरवून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. त्याचाच आम्हाला फटका बसला आहे. पण विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही या गोष्टीची पुरेपूर काळजी घेऊ. दलित आणि मुस्लिमांमधील नाराजी दूर करू. त्यांच्यातील गैरसमज दूर करून त्यांना आमच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करू, असेही रामदास आठवले म्हणाले.

महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांचा पक्ष शिवसेना, अजित पवारांचा पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, महादेव जानकर यांचा पक्ष, आरपीआय, विनय कोरे आणि सदाभाऊ खोत यांचे पक्षदेखील सामील आहेत. यात आरपीआयला आठ ते दहा जागा मिळाव्या, अशी आमची इच्छा आहे. यामध्ये जागेचा आकडा कमी-जास्त होऊ शकतो. पण सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही आठ ते दहा जागांची मागणी केली आहे, असे रामदास आठवले म्हणाले.

आरक्षणावर भाष्य

मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण देण्याचा निर्णय झाला आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची पुरेपूर काळजी राज्य सरकारने घेतली आहे. त्यामुळे मराठा, ओबीसी (OBC) आणि दलितांबरोबर आदिवासी समाज देखील आमच्याबरोबर असेल. अल्पसंख्याक समाजालाही आम्ही आमच्या बरोबर घेऊ. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही 170 ते 180 जागा निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील 10 वर्षांत भरपूर विकास केला आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा जनतेपुढे मांडणार आहोत. ज्यामुळे विधानसभा निवडणुकीत आम्हाला नक्कीच चांगलं यश मिळेल, असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!