महाराष्ट्र

Assembly Election : आठवलेंना आणखी बसणार धक्के?

Ramdas Athavle : थुलकर रिपाइंच्या (आंबेडकर) कार्यकारी अध्यक्षपदी

RPI : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) या पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आठवलेंच्या रिपाइं पक्षाचे पदाधिकारी व त्यांचे जुने सहकारी भूपेश थुलकर यांनी त्यांना सोडचिठ्ठी दिल्यावर ते रिआइं (आंबेडकर) पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष झाले आहेत.

आठवले यांनी भाजपच्या नादी लागून वैचारिक भूमिका सोडली असून त्यामुळेच आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये असंतोष खदखदत असल्याची टीका करण्यात येत आहे. येत्या काळात आणखी काही जुणे कार्यकर्ते आठवलेंची साथ सोडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आठवले यांनी पक्ष स्थापन केल्यापासून त्यांनी आपली वैचारिक भूमिका सोडली असून, त्यांनी त्यांचा पक्ष भाजपच्या दावणीला बांधला आहे, अशी टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) या पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. मोहनलाल पाटील यांनी केली. रिपाइं (ए) असे नामाभीधारण असलेला पक्ष रिपाइं (आठवले) असे मानले जात होते. मुळात तो रिपाइं (आंबेडकर) असा होता.

जुने पँथर, चळवळीतील कार्यकर्ते व आक्रमक नेतृत्व म्हणून पक्षाने आठवले यांना अध्यक्ष केले होते. त्यानंतर त्यांनी याच पक्षाचा आधार घेत लोकसभा व राज्यसभेत खासदारकी व केंद्रात मंत्रिपदसुद्धा मिळवले. पक्ष स्थापन केल्यापासून ते रिपाइंचे विचार व आंबेडकरी चळवळीचा बाणा गहाण ठेवून भाजपच्या दावणीला बांधले गेले आहेत. यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. हा खदखदत असलेला असंतोष आता असह्य झाल्याने आठवले यांना त्यांचे अनेक कार्यकर्ते सोडत आहेत, असा दावा पाटील यांनी केला आहे.

Nagpur : फडणवीस-गुडधेंना मजूर, पानठेलाचालकाने दिले आव्हान!

भाजपचे काम करणार नाही!

भूपेश थुलकर व इतर पदाधिकाऱ्यांनी चार दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन आम्ही भाजपचा प्रचार करणार नसल्याचे सांगितले होते. विशेष म्हणजे त्यांनी आम्हाला आठवले हवेत, पण भाजप नको असेच स्पष्ट केले होते. भाजपने आठवलेंचा आणि पक्षाचा वारंवार अपमान केला आहे. अपमानाची मालिका यंदाच्या निवडणुकीतही कायम आहे. त्यामुळे आम्ही भाजपचे काम करणार नाही, असे थुलकर यांनी म्हटले होते. त्यानंतर त्यांनी अचानक पक्षाचा राजीनामा दिल्यामुळे चर्चांना उधाण आले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!