महाराष्ट्र

Lok Sabha Election : पिल्लेवान एक्झिट, आनंदराज इन; आंबेडकरांच्या खेळीने अमरावतीत ट्विस्ट !

Anand Raj Ambedkar : सध्या मला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवारी जाहीर झाले असल्याचा दावा त्यांनी केला.

Lok Sabha Election : अनुसूचित जातीकरिता राखीव असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाल्याचा दावा रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी केल्याने जिल्ह्यात विविध चर्चांना उधाण आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मध्यंतरी अमरावतीमध्ये सभा घेऊन शक्तिप्रदर्शन केले होते. त्याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी कडून तरुण उमेदवार प्राजक्ता पिल्लेवान यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती.

लवकरच आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करून आमची भूमिका स्पष्ट करू, अशी माहिती पक्षाच्यावतीने देण्यात आली होती. मात्र आज (ता. 2) रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर म्हणाले की, सध्या देशाचे संविधान धोक्यात आहे अमरावती जिल्ह्यात विविध प्रश्न निर्माण झाले आहे. संत्रा प्रक्रिया उद्योग नाहीत, आयटी पार्क नाही, बेरोजगारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे हे सर्व प्रश्न निकाली काढण्यासाठी मी उमेदवारी जाहीर करत आहे. सध्या मला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवारी जाहीर झाले असल्याचा दावा त्यांनी केला.

Nana Patole : मला अडीच महिन्यांपासून ‘टॉर्चर करत आहे

वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा म्हणाले की, आनंदराज आंबेडकर यांचा स्वतःचा पक्ष आहे. वंचित बहुजन आघाडीने अद्याप कुठलाही निर्णय घेतला नाही. येणाऱ्या चार तारखेच्या अगोदर आम्ही निर्णय घेऊ. संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात आता राजकीय घडामोडींनी प्रचंड वेग पकडला आहे.

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात खासदार नवनीत राणा भाजपकडून, प्रहारकडून दिनेश बूब, काँग्रेसकडून बळवंत वानखडे तर वंचित बहुजन आघाडीकडून प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र वंचितने आपल्याला उमेदवारी दिली असल्याची माहिती आनंदराज आंबेडकर यांनी दिल्याने अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत ट्विस्ट आला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!