प्रशासन

IAS Officer : ऑडीवर लाल दिवा, वरिष्ठांचे चेंबर बळावले, आता वाशिममध्ये जिल्हाधिकारी

Washim : वादग्रस्त आयएएस अधिकाऱ्याची पुण्यातून उचलबांगडी 

IAS Officer Pooja Khedkar : परिवाक्षाधिन सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना नियमात नसतानाही खासगी महागड्या गाडीवर लाल दिवा लावला, त्यावर महाराष्ट्र शासन लिहिले एवढेच नव्हे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अँटी चेंबरही बळकावले. असे अनेक प्रताप नावावर असलेल्या महिला आयएएस अधिकाऱ्याची आता वाशिमला जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. 2023च्या बॅचच्या आयएएस अधिकारी डॉ. पूजा खेडकर असे या वादग्रस्त अधिकाऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे या सनदी अधिकाऱ्याचे वडील, आजोबा देखील प्रशासकीय सेवेत होते.  

पुणे येथे परिवाक्षाधिन सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती असलेल्या पूजा खेडकर यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. पुण्यात त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. त्यांच्या खासगी ऑडी गाडीवर ‘महाराष्ट्र शासन’ असा बोर्ड लिहिला होता. ही गाडी सरकारी असल्याचे त्यांनी भासवले. खासगी गाडीवर अंबर दिवा लावणे चुकीचे असताना देखील प्रोबेशनरी आयएएस अधिकारी खेडकर यांनी गाडीवर अंबर दिवा लावला होता. विशेष म्हणजे या अधिकारी मॅडम त्यांच्या या गाडीचे दिवे दिवसासुद्धा चालू ठेवतात. या अधिकारी मॅडमचे कारनामे फक्त कार पुरतेच मर्यादित नाही. तर वरिष्ठ अधिकारी शासकीय कामासाठी मुंबईला मंत्रालयात गेले असताना त्यांचे अँटी चेंबर बळकावले. या अधिकारी मॅडमने चक्क वरिष्ठांच्या अँटी चेंबरचे सामान बाहेर काढून तिथे स्वतःचे कार्यालय थाटले आणि स्वतःच्या नावाचा बोर्डसुद्धा लावला होता, अशी माहिती आता पुढे आली आहे.

त्यांच्या या वर्तनाबद्दल पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अप्पर मुख्य सचिव मंत्रालयाकडे अहवाल सादर केला. या अहवालात जिल्हाधिकाऱ्यांनी ‘माझे कार्यालय हे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या शेजारीच हवे तसेच मला शिपाई पाहिजे आणि हीच गाडी पाहिजे’ असा अधिकारी मॅडमचा हट्ट आहे, असा उल्लेख केला. अधिकारी मॅडमचे वडील दिलीप खेडेकरे हे जिल्हाधिकारी कार्यालयात येतात आणि तिथल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना दम देतात असा आरोप करण्यात आला आहे.

कोण आहेत पूजा खेडकर?

वादग्रस्त ठरलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडेकर या 2023 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. मागील जून महिन्यात त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून पुणे जिल्हा देण्यात आला होता. परंतू नियुक्तीपासूनच त्यांनी अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या मागण्या सुरू केल्या.

Vasant More : राज ठाकरेंचा वाघ उद्धव ठाकरेंच्या पक्षात

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत. त्यांचे आजोबा जगन्नाथराव बुधवंत हे आयएएस अधिकारी होते. तर, वडील दिलीप खेडकर हे प्रदूषण विभागाचे आयुक्त राहिलेले आहेत. सेवानिवृत्त झाल्यावर वंचितच्या पाठिंब्यावर ते अहमदनगर दक्षिणमधून यंदाची लोकसभा निवडणूक लढले आहेत. तर, आई डॉ. मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!