Political News लोकसभा निवडणूक पार पडली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीत आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना कठोर संदेश दिला आहे. “मला जर मोदींसोबत जायचं तर मी महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांच्या मध्ये बसून सांगेन, बंडखोरी करणार नाही”. असे उद्धव ठाकरे म्हणाले. जे लोक सोडून गेले त्यांना परत घेणार नाही. तसेच जे सोडून गेले त्यांना परत घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. उद्धव ठाकरेंच्या सुरात सूर मिसळत बंडखोर नेत्यांना परत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे शरद पवार म्हणाले.
शनिवारी 15 जुन रोजी विधानसभा निवडणुकांबाबत बोलण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना ( उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यामधील प्रमुख नेत्यांची मुंबईत यशवंतराव चव्हाण केंद्र येथे संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी संबोधित केले. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 27 जूनपासून सुरू होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांना थेट इशारा दिला.
राज्यात महाविकास आघाडीला 31 तर महायुतीला लोकसभेत फक्त 17 जागा मिळाल्या. महाविकास आघाडीचे यश पाहता सोडून गेलेले लोक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ठाकरे आणि पवार गटात येणार, असा दावा संबंधित पक्षांतील नेत्यांनी केला. यावर सोडून गेलेल्या लोकांना पुन्हा सामावून घेणार का, असा प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले की, गद्दारांना परतीचे दरवाजे बंद आहेत. तर शरद पवारांनी त्यांना पुन्हा सामावून घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे उत्तर दिले.
आमचाच फायदा
विधानसभेला मोदी जेव्हढ्या सभा घेतील तेव्हढा आमचा फायदा लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात नरेंद्र मोदींच्या जेवढ्या जास्त सभा झाल्या, तेवढा जास्त आमच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळाला. बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी? आमच्या उमेदवारांना जास्त जागा मिळाल्यानंतर हे गाणं मला आठवतंय. पण त्या पारिजातला खत पाणी घालत राहणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या राज्यात 18 सभा झाल्या एक रोड शो झाला, तिथे आमच्या उमेदवारांना मोठा फायदा झाला. त्यामुळे त्यांचे मला विशेष आभार मानावे लागतील. विधानसभेला मोदींनी अजून जास्त सभा घेतल्या पाहिजे, म्हणजे त्या आमच्या फायद्याच्या ठरतील,” असा टोला यावेळी शरद पवार यांनी लगावला.