Winter Assembly Session : महायुतीचे सरकार विधिमंडळामध्ये कोणत्याही प्रकारच्या चर्चेसाठी तयार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना केवळ राजकारण करायचं असेल, तर त्यांना राजकीय पद्धतीनेच उत्तर मिळेल. महायुती सरकार विधिमंडळामध्ये कोणत्याही चर्चेतून पळ काढणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विधिमंडळात पत्रकारांशी चर्चा करताना त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना इशाराच दिला.
परभणी आणि बीड येथील घटनेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी विधानसभेमध्ये स्थगन प्रस्तावाची मागणी केली. यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी योग्य वेळी स्थगन प्रस्ताव स्वीकारला जाईल अशी भूमिका घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील चर्चेसाठी तयारी दर्शवली. परंतु त्यानंतरही काँग्रेसकडून महायुती सरकारवर टीका करण्यात आली. या सगळ्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले.
ईव्हीएमचा मुद्दा निराधार
ईव्हीएम संदर्भातील सर्व मुद्दा निराधार आहे. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. ज्या राज्यामध्ये काँग्रेसचे सरकार आहे, त्या ठिकाणी ईव्हीएममध्ये कोणताही घोर नसतो. मात्र ज्या राज्यांमध्ये काँग्रेसला अपयश येते, त्या सगळीकडे घोळ होत असतो, असा त्यांचा आरोप असतो. त्यामुळे मतदान यंत्रांचा मुद्दा निराधार असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ओबीसी समाजाबद्दल काँग्रेसकडून जात आहे. मुळात काँग्रेसला ओबीसीच्या मुद्द्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही. महायुतीच्या सरकारने ओबीसी समाजाच्या हितासाठी 48 शासन आदेश काढले आहेत. ओबीसी कल्याण मंत्रालय आपण मुख्यमंत्री असताना सुरू झाले. त्यामुळे ओबीसी म्हणून नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर काँग्रेसमध्ये जो अन्याय होतो त्याचा राग त्यांनी महायुतीवर काढू नये, असा सल्लाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
Akash Fundkar : भाऊसाहेबांच्या चिरंजीवाला मिळावे अकोल्याचे ‘आकाश’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देखील ओबीसी समाजाच्या हिताचे अनेक निर्णय झालेले आहेत. त्यामुळे काँग्रेसला ओबीसी समाजासंदर्भात बोलण्याचा काही अधिकार नाही. ओबीसीत काय तर इतर अनेक समाजांना काँग्रेसने आतापर्यंत विकासापासून वंचित ठेवले आहे. आमची भूमिका विकासाची आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही, असेही फडणवीस म्हणाले. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून होणाऱ्या टीकेला फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. आव्हाड यंदा आरोप करण्यासाठी कोणतेही पुरावे लागत नाही. त्यामुळे त्यांच्यावर बोलण्यापेक्षा आपण आपल्या कामावर लक्ष देऊ, असेही मुख्यमंत्री म्हणाले
भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या संदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्या संदर्भात वेगळा निर्णय घेण्याचा मानस केला आहे. त्यामुळे यासंदर्भात लवकरच चित्र स्पष्ट होईल, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.