महाराष्ट्र

Assembly Election : नांदेडमधून रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी!

Nanded : काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर; निवडणुकीचा धुराळा उडाला

Assembly Election : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासाठी विधानसभेची निवडणूक जाहीर केली. यामध्ये नांदेड लोकसभा पोटनिवडणूक देखील जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून त्याची मतमोजणी आणि निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. या निवडणूकीसाठी २९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. यातच आता नांदेड लोकसभा पोटनिवडणूकीसाठी काँग्रेसकडून उमेदवार घोषीत केला आहे.

काँग्रेसकडून उमेदवारी

अलिकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे वसंत चव्हाण खासदार म्हणून निवडून आलेत. परंतु त्यांचे २६ ऑगस्टला अकाली निधन झाले. यासाठी आता वसंत चव्हाण यांचे सुपुत्र रविंद्र चव्हाण यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी देखील रवींद्र चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तेब केले आहे.

आज केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या दोन लोकसभा पोटनिवडणुकांसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याची मतमोजणी ही २३ नोव्हेंबरला होणार आहे. म्हणजे महाराष्ट्रात ज्यावेळी विधानसभेची निवडणुक होत आहेत. त्याच तारखेला लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी देखील मतदान प्रक्रिया पार केली जाणार आहे.

 प्रस्ताव मंजूर

रवींद्र चव्हाण यांच्या नावाला याआधी स्थानिक नेत्यांकडून देखील प्रस्ताव मंजूर केला होता. यानुसार आता आता त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मागच्या लोकसभेच्या वेळी भाजपकडून माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी निवडणूक लढवली होती. आता पोटनिवडणूकीत भाजपकडून कुणाला उमेदवारी दिली जाते, ते पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Nagpur : महाविकास आघाडीत बंडखोरीचे संकेत?

वसंतरावांच्या जागी मुलगा

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांना पराभवाची धूळ चारली होती. नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण आणि भाजपच्या अजस्त्र ताकदीला धक्का दिला होता. त्यामुळे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण निधनाने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला होता. त्यांच्या अचानक जाण्याने वसंत चव्हाण यांची गादी त्यांच्या चिरंजीवानेच चालवावी असे काँग्रेसला वाटत होते. त्यामुळे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण यांच्या उमेदवारीचा जिल्हा काँग्रेसने ठरावही संमत केला होता. त्यानंतर, आज अधिकृतपणे दिल्लीतील काँग्रेसकडून रविंद्र चव्हाण यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!