Hunger Strike : जिजाऊंच्या राजवाड्यापुढे शेतकरी नेते रविकांत तुपकर , ४ सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.शेतकऱ्यांच्या समस्या व प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी येणार आहे.पीकविमा, कर्जमुक्ती, सोयाबीन-कापूस दरवाढ, वन्यप्राणी बंदोबस्त, तार कुंपण, शेडनेट बीज उत्पादन नुकसान भरपाई , अनेक प्रश्नांसाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.तुपकरांच्या या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी शेतकऱ्यांनी “चलो सिंदखेडराजा”चा नारा दिला आहे. दरम्यान हे आंदोलन राज्यभर पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शेवटचा अल्टिमेट
सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलने करीत केली.. सरकार मात्र भूमिका घेत आहे. त्यामुळे सरकारला आमचा हा शेवटचा अल्टिमेटम आहे. ठोस निर्णय घेतले नाही, तर मात्र ४ सप्टेंबरपासून राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरतील. आणि मग सरकारला जड जाईल, असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला होता. परंतु अद्यापही शासनाने दखल न घेतल्यामुळे आता ते आंदोलन सुरू करणार आहेत.
आक्रमकता कायम
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी तुपकरांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. आता त्यांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. गेल्या आठवड्यात रविकांत तुपकरांनी मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आंदोलनाची हाक दिली होती, त्यावेळी आंदोलनासाठी जात असताना मरीन ड्राईव्ह परिसरात त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी गिरगाव चौपाटी येथे शेतकरी आत्महत्येचे प्रात्यक्षिक दाखवून आंदोलन केले होते. त्यानंतर आता सिंदखेडराजा येथील मासाहेब जिजाऊंच्या राजवाड्यापुढे अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात होणार आहे.
राज्यभर आंदोलन पेटणार
राज्यातील २७ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणारे कार्यकर्ते या आंदोलनात उतरणार आहेत. गावागावात आंदोलन करण्याची तयारी शेतकऱ्यांनी चालवली आहे. त्यामुळे हे आंदोलन निश्चित पेटणार आहे. राज्य सरकारला अडचणीत येणार आहे. हे आंदोलन जात, धर्म,पक्ष, संघटना विरहित असणार आहे, त्यामुळे आपल्या हक्कासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून रस्त्यावर उतरावे, असे आवाहन रविकांत तुपकरांनी केले आहे.
Maharashtra Government : महाविकास आघाडीचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरीत..
या आहेत मागण्या
कर्जमुक्ती करावी, शेतमालाला प्रत्यक्ष बांधावरील उत्पादन खर्चाच्या आधारे 50% नफा या सूत्राप्रमाणे भाव मिळावा. गेल्या वर्षी खरीप व रब्बी हंगामात पिकविमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट पिकविमा मिळावा.गेल्या वर्षीच्या सोयाबीन-कापसाला हेक्टरची मर्यादा न लावता प्रति क्वि. 3000 /- रु भाव फरक मिळावा. या वर्षीच्या 2024 च्या खरीप हंगामातील सोयाबीनला प्रति क्वि.9000/- रु. व कापसाला प्रति क्वि. 12,500/- रु. भाव मिळण्यासाठी राज्य सरकारने आतापासूनच केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, शेतीला उद्योगाचा दर्जा देवून पूर्णवेळ वीज, पाणी, नवीन तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, जंगली जनावरांच्या त्रासापासून शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी शेतीला सरकारने सौर उर्जेचे नाही तर सिमेंटचे / तारेचे मजबूत कंपाऊंड करून द्यावे, तसेच शेतीपिकांच्या नुकसान भरपाईत वाढ करावी, शेतकऱ्यांना सुलभतेने पेरणीपूर्व पिककर्ज उपलब्ध होण्याची व्यवस्था राज्य सरकारने उभारावी.
पिक विमा ची मागणी
शेतमजुरांना सरकारकडून विमा सुरक्षा कवच व मदत मिळावी, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजने अंतर्गत नियमित कर्ज भरणारे पण ५० हजार रु. प्रोत्साहन अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने प्रोत्साहन अनुदान मिळावे, धानाला प्रति क्वि.२०००/- रु.बोनस मिळावे, संत्रा-मोसंबीच्या गळतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, विहरी व घरकुलाचे रखडलेले अनुदान तातडीने द्यावे, फळबाग व सिंचन अनुदान तातडीने द्यावे, महा डी.बी.टी. अंतर्गत कृषि अवजारांचे थकलेले अनुदान तातडीने जमा करावे, शेतकऱ्यांच्या वरील मागण्यांसंदर्भात सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावे, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.
नुकसान भरपाई द्या – तुपकर
2 दिवसापासून राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी धरणे ओव्हर फ्लो झाल्याने नद्यांना पूर आला. शेतपिकांचे, शेतजमिनीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी जनावरेही दगावली आहे. त्यामुळे यासर्व झालेल्या नुकसानीची १००% नुकसान भरपाई देण्याची मागणी रविकांत तुपकरांनी केली आहे.