महाराष्ट्र

Lok Sabha Election : रविकांत तुपकर ढसाढसा रडले कारण..

Buldhana Constituency : चार एकरवाल्या खऱ्या शेतकऱ्याचा लढा

Ravikant Tupkar : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दीच्या साक्षीने लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. घरची चटणी-भाकरी घेऊन स्वयंस्फूर्तीने बुलढाण्यात आलेल्या या विशाल समुदयाने शेतकर्‍यांचे लेकरू यंदा संसदेत पाठविण्याचा निर्धार केला असल्याचे प्रत्येकाच्या देहबोलीवरून दिसून येत होते. दुपारी रविवकांत तुपकर यांनी पत्नी अॅड. शर्वरी तुपकर यांच्यासह उमेदवारी अर्ज दाखल केला.

याप्रसंगी झालेल्या निर्धार सभा पार पडली. यावेळी रविकांत तुपकरांनी खासदार तथा एकनाथ शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांच्यावर तुफान टीकास्त्र डागले. ही लढाई चार एकरवाला खराखुरा शेतकरी विरूद्ध शेकडो कोटींची जमीन असलेलला नकली भूमिपुत्र अशी असणार आहे. माझी निवडणूक जनतेनेच हाती घेतली आहे. मायबाप जनता माझ्या जीवतोड संघर्षाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास तुपकरांनी याप्रसंगी व्यक्त केला. तुपकर अर्ज भरण्यासाठी जाताना बुलढाण्याच्या रस्त्यावर गर्दी पहायाला मिळाली. लोकांनी खांद्यावर उचलून घेत, हलगीच्या निनादात व गगनभेदी घोषणांच्या कल्लोळात तुपकरांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेले.

आक्रमक, भावनिक भाषणे

हलगी, बैलबंडीसह स्व-खर्चाने घरची चटणी-भाकर खावून बुलढाण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या साक्षीने तुपकर यांनी उमेदवारी दाखल केली. त्यांचे नामांकन म्हणजे स्वबळावर केलेले शक्तीप्रदर्शन ठरले. बुलढाणा येथील जिजामाता व्यापार संकुल नजीकच्या मैदानात शेतकरी नेते रविकांत तुपकरांची जाहीर सभा पार पडली. यावेळी तुपकरांनी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. आपल्या भाषणातून त्यांनी खासदार प्रतापराव जाधव यांनाच लक्ष्य करीत बुलढाणा मतदारसंघातील लढत महायुतीविरुद्ध असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले.

संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजारपेठ, कारंजा चौकमार्गे जनसागराची रॅली निघाली. यानंतर तुपकरांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 22 वर्षे जनतेसाठी अविरत झटलो. आता तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, असे आवाहन तुपकरांनी केले. निर्धार सभेत रविकांत तुपकरांची दोन रूपे पाहायला मिळाली. सभेत उपस्थित शेतकरी, युवक, माता भगिनींबद्दल बोलताना तुपकर अतिशय भावूक झाल्याचे दिसले. मात्र खासदार जाधव यांच्यावर बोलताना ते रोखठोक, आक्रमक होते

Lok Sabha Election : महिलेला 14 दिवस तुरुंगात ठेवणारा उद्धव ठाकरे हा लाचार मनुष्य !

दत्तक कन्यमुळे डोळ्यात पाणी!

माझे नाव वैष्णवी भारंबे-तुपकर आहे, मी सात वर्षांची असताना माझ्या आई-वडिलांचा अपघातात मृत्यू झाला. त्यावेळी माझे दोन भावंडे व मी अतिशय लहान होते. आम्हाला कोणाचा आधार नव्हता. पण त्यावेळी माझ्या रविकांत बाबांनी आम्हाला आधार दिला. आमचा सांभाळ केला मी व माझ्या भावंडांना चांगले शिक्षण दिले. त्यामुळेच मी राज्यातील दोन नंबरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. रविकांत बाबांमुळेच आम्ही चांगले शिक्षण घेत आहोत, असे भाषण देणाऱ्या वैष्णवीने अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळले.

बायकोचे मंगळसूत्र विकले

मोताळा तालुक्यातील सारोळा मारोती येथील गोपाल सिप्पलकर यांनी रविकांत तुपकरांना स्वतःच्या बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र विकून निधी दिला आहे. सिप्पलकरांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यांच्या कृतीमुळे तुपकरांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांनी ते पैसे परत केले. पण त्या नवरा बायकोने शपथ घातल्यामुळे तुपकरांनी त्यांच्या भावनांचा आदर केला. सिप्पलकरांच्या भावनांपुढे व्यक्त होण्यासाठी शब्द नाहीत. जनतेच्या प्रेमाचे उपकार कुठे फेडू? अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकरांनी दिली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!