महाराष्ट्र

Lok Sabha Election :  हिम्मत असेल तर अपक्ष लढून दाखवा

Ravikant Tupkar : माझ्याशी फाईट नाही तर मग वारंवार माझंच नाव का घेता ?

Lok Sabha Election : रविकांत तुपकर यांची माझ्यासमोर लढण्याची लायकी नाही, असे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव म्हणत आहेत. त्यांची जर माझ्याशी फाईट नाही तर मग ते वारंवार माझंच नाव का घेतात? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. आज गावखेड्यातील व शहरातील सर्वसामान्य नागरिक माझ्या पाठीशी तन-मन-धनाने उभा आहे. लोक स्वतःहून पैसे देत आहेत, समोर येत आहेत. माझ्या वाट्याला सर्वसामान्यांचे जे प्रेम आले ते तुमच्या वाट्याला कधीच येऊ शकत नाही. तुमच्यात हिम्मत असेल तर पक्ष सोडा आणि माझ्या प्रमाणे अपक्ष म्हणून लढवून दाखवा, असे जाहीर आव्हान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी नामोल्लेख टाळून शिंदे गटाचे उमेदवार तथा मावळते खासदार प्रतापराव जाधव यांना दिले.

गुढीपाडव्या निमित्त रविकांत तुपकर यांनी मंगळवारी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊंचे दर्शन घेऊन हजारो नागरिकांच्या साक्षीने प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर सिंदखेडराजा शहरातून रॅली काढण्यात आली. यांनतर  झालेल्या जाहीर सभेत रविकांत तुपकरांनी  सांगितले की, ही लढाई  सर्वसामान्य जनतेची लढाई आहे. आज सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद आणि पाठिंब्यानेच लोकसभेच्या रिंगणात उभा आहे. जात, धर्म, पक्षावर ही निवडणूक नाही तर यावेळी आपले प्रश्न, आपल्या समस्यांवर ही निवडणूक होणार आहे.  मी कोणत्या पक्षाचा, कोणत्या नेत्याचा उमेदवार नाही.  मी सर्वसामान्य जनतेचा उमेदवार आहे आणि शेवटपर्यंत सर्वसामान्य जनतेचाच राहणार आहे. माझा विजय हा सर्वसामान्यांचा विजय ठरणार आहे, अशी ग्वाही देत रविकांत तुपकर यांनी हजारो नागरिकांच्या साक्षीने प्रचाराला आरंभ केला.

Lok Sabha Election : रविकांत तुपकर ढसाढसा रडले कारण..

 ‘एक नोट एक वोट’

शेतकऱ्यांचा कणखर बाणा, निवडून आणा ‘पाना’,अशा घोषणा देत नागरिकांनी सिंदखेडराजा नगरी दणाणून सोडली होती. विशेष म्हणजे अनेकांनी रविकांत तुपकरांना  ‘एक नोट एक वोट’ या तत्त्वानुसार निवडणुकीच्या खर्चासाठी आर्थिक मदत देण्यासाठी रांग लावली होती. तसेच, मी २२ वर्षे शेतकरी, कष्टकरी जनतेसाठी जीवावर उदार होऊन काम केले आहे. माझ्या कामाची मजुरी म्हणून यंदा मला तुमचे एक मत द्या, असे हात जोडून आवाहन देखील तुपकरांनी जिल्ह्यातील शेतकरी व कष्टकरी वर्गाल केले. हे बोलताना तुपकर भावविभोर झाल्याचे पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळले होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!