Assembly Election : एकीकडे राज्यात तिसऱ्या आघाडीची स्थापना करणारे प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना त्यांच्या एकमेव आमदाराने साथ सोडली. त्यामुळे बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. असे असतानाच ही बच्चू कडू यांचीच खेळी असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात पुन्हा आमदार रवी राणा व आमदार बच्चू कडू यांच्यात वाद पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान बच्चू कडू यांनी पटले यांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचे म्हटले आहे.
महाशक्तीची स्थापना
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आयाराम गयाराम यांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे अनेक राजकीय पक्षांची साथ सोडून जणाऱ्यांमध्ये जवळच्या नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती नंतर तिसऱ्या आघाडीचा प्रयोग पुढे आला आहे. छत्रपती संभाजी राजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी यासह इतर छोट्या पक्षांनी एकत्र येत महाशक्तीची स्थापना केली आहे. मात्र तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या आमदार बच्चू कडू यांनाच त्यांच्या पक्षात मोठा धक्का बसला आहे. प्रहार जनशक्ती पार्टीचे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल हे सध्या शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. तर बच्चू कडू यांनी यानंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
मुख्यमंत्र्यांनी एक घाव दिला आता आम्ही हजार घाव देऊ असे ते म्हणाले होते. राजकुमार पटेल यांच प्रहार पक्ष सोडणं ही भाजप शिवसेनेची खेळी आहे, असा आरोप बच्चू कडू यांनी केला. अजूनही दोन तीन महत्त्वाचे कार्यकर्ते जे जाण्याची शक्यता असल्याचा गौप्यस्फोट त्यांनीच केला. प्रत्येकाचं वैयक्तिक स्वार्थ असत. ते तिथे जात आहेत, त्यांनी तिथे सुखी राहाव असं देखील कडू यांनी म्हटलं आहे. राजकुमार पटेल यांनी सांगितलं की दोस्ती कायम राहील तर आम्ही दोस्ती कायम ठेवून राजकुमार पटेल विरोधात उमेदवार देऊ, असे देखील कडू यांनी स्पष्ट केले. तर आता यावर आमदार रवी राणा यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान रवी राणा यांनी बोलतांना आमदार बच्चू कडू यांच्यावर आरोप केले आहेत. प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांना शिवसेना शिंदे गटात बच्चू कडू यांनीच पाठवलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व बच्चू कडू यांच्यात साठ गाठ आहे तर बच्चू कडू यांचीच ही खेळी आहे असा खळबळजनक गौप्यस्फोट आमदार रवी राणा यांनी केला आहे.
सबसे बडा रुपया
बच्चू कडू हे सोयीनुसार राजकारण करतात. मेळघाट मध्ये शिंदे सेनेने राजकुमार पटेलला उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधात काम करू असा इशारा रवी राणा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला, “बाप बडा ना भय्या सबसे बडा रुपया” अश्या प्रकारे बच्चू कडू यांच राजकारण आहे अशी टीका रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केली आहे. तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांचा हिशेब करू असा इशाराही रवी राणा यांनी दिला.