महाराष्ट्र

Ravi Rana : जितू दुधाने बाहेर पडताच कार्यकारिणीत बदल

Assembly Election : पक्षातील आठ निष्ठावंतांना दिली संधी

Yuva Swabhiman Party : युवा स्वाभिमान पक्षाचे नेते आणि बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांच्या पक्षात मोठा स्फोट झाला आहे. पक्षस्थानेच्याही पूर्वीपासून राणा यांच्यासोबत असलेले जितू दुधाने यांनी आता राणांचा साथ सोडला आहे. पक्षात घुसमट होत असल्याचं नमूद करीत गेल्या 17 वर्षांपासून राणा यांच्यावरील सर्व संकटं स्वत:वर घेणारे दुधाने आता ‘प्रहार’सोबत गेले आहेत. अलीकडेच बच्चू कडू यांच्या उपस्थितीत दुधाने यांनी प्रहार जनशक्ती पार्टीत प्रवेश केला आहे.

हार जनशक्‍ती पक्षाचे संस्‍थापक आमदार बच्‍चू कडू यांनी युवा स्‍वाभिमान पक्षाचे संस्‍थापक आमदार रवी राणा यांना मोठा धक्‍का दिला आहे. जितू दुधाने युवा स्वाभिमान पक्षाचे मुख्य प्रवक्ता होते. यापेक्षाही ते रवी राणा यांचे ‘राइट हॅन्ड’ होते हे महत्वाचं आहे. दुधाने गेल्यानंतर राणा यांनी लगेच आठ कार्यकर्त्यांना प्रवक्ता पद दिलं आहे. जाण्यापूर्वी दुधाने यांनी राणा यांच्यावर अनेक आरोप केले. राणा यांच्यासाठी लढताना आजपर्यंत अनेक गुन्‍हे आपल्यावर दाखल झालेत. आपण कधी मागे हटलो नाही. पण आता आपली घुसमट होईल असं वातावरण आहे.

Bacchu Kadu : बच्चू कडू न भिणारा आहे भिडू

राणांचे प्रयत्न

दुधाने यांची समजूत काढण्‍यासाठी रवी राणा यांनी अनेक प्रयत्‍न केले. पण त्यात त्यांना यश आले नाही. दुधाने यांनी मोबाइलही बंद करून ठेवला होता. त्यानंतर त्यांचा मोबाइल सुरू झाला तो थेट अचलपूरमध्ये बच्चू कडू यांच्यासोबत एकत्र आल्यावरच. रवी राणांना पक्ष सांभाळता आला नाही. जितू दुधाने यांना आम्ही बोलावलेलं नाही. ते स्‍वत:हून आमच्‍याकडे आल्याचं बच्चू कडू यावेळी म्हणाले. दुधाने गेल्यानंतर आता राणा यांनी नवीन विस्तारित कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत आठ जणांना स्थान देण्यात आलं आहे.

त्यानुसार आता राणांच्या पक्षात सहा मुख्य प्रवक्ता असतील. दोन महिला प्रवक्ता असतील. पक्षाचे कोषाध्यक्ष शैलेंद्र कस्तुरे हे देखील मुख्य प्रवक्ता असतील. याशिवाय बाळू इंगोले पाटील, गणेशदास गायकवाड, नाना आमले, अमोल मिलके हे मुख्य प्रवक्ता असतील. याशिवाय राणा यांचे आणखी एक नीकटवर्तीय मिलिंद काहाळे यांनाही मुख्य प्रवक्ता करण्यात आलं आहे. काहाळे हे अभियंता आहेत. अमरावतीच्या नाट्य आणि बांधकाम क्षेत्रात ते कार्यरत आहेत. काहाळे हे देखील राणा यांच्यासाठी समर्पित भावनेने काम करीत आले आहेत. असं असलं तरी दुधाने यांच्या जाण्यानं राणा आणि युवा स्वाभिमान दोघांनाही हादरा बसला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!