महाराष्ट्र

Maharashtra Assembly : विधानसभेत आमदार राणांनी मारली पलटी

Monsoon Session : आव्हाड अन् वडेट्टीवार पडले तुटून 

Political War : विधानसभेत अमरावती येथील बडनेराचे आमदार रवी राणा यांचे 1 जुलै रोजी राज्यपालांच्या अभीभाषणावरील भाषण वेगळ्याच वळणावर गेले. आमदार रवी राणा यांनी काँग्रेवर टीका करताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न द्यायला काँग्रेसने विरोध केला, अशी टीका केली. ज्यामुळे सभागृहात जोरदार गदारोळ पहायला मिळाला. विरोधक राणांच्या वक्तव्यावर तुटून पडल्याने नंतर राणांनी आपल्या वक्तव्यावरून पलटी मारीत ‘मी काँग्रेसने विरोध केला असं बोललो नाही, तर भारतरत्न काँग्रेसने नाही दिला असं बोललो’, असे म्हणून बाजू सावरण्याचा राणांनी प्रयत्न केला. 

विधानसभा सभागृहात राज्यपालांच्या अभीभाषनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आणि त्यानंतर अर्थसंकल्पावर चर्चा झाली. या चर्चेत अनेक आमदारांनी आपली मतं व्यक्त केली तर, काहींनी टीका देखील केली. अर्थसंकल्पावर बोलताना जेव्हा आमदार रवी राणा बोलायला उभे राहिले, तेव्हा त्यांनी बोलता बोलता काँग्रेवर टीका करताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळा निवडणुकीत पाडण्याचं काम काँग्रेसने केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न द्यायला विरोध काँग्रेसनेच केला, अशी टीका केली आणि सभागृहात गदारोळ झाला.

ते आव्हाड कसले

या विषयाला घेऊन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार योगेश सागर आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी उड्या घेतल्या. या टिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळाले. काँग्रेसने कधीही डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतरत्नला विरोध केला नाही, असं म्हणत, रवी राणा जे बोलले ते रेकॉर्डवरुन काढून टाका अशी मागणी, जितेंद्र आव्हाड यांनी अध्यक्षांना केली.

रवी राणा जे काही बोलले ते तपासून त्यानंतर ते रेकॉर्डवरुन काढून टाकू असं सांगण्यात आल्यानंतर, जितेंद्र आव्हाड आणि वडेट्टीवार हे आणखीनच आक्रमक झालेत. पण शांत बसणार ते आव्हाड कसले? मग आव्हाडांनी देखील,

Monsoon Session : मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी कागदपत्रांमध्ये दिली सूट

इतिहासच सभागृहात वाचून दाखविला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी सविधान सादर करण्यात आले आणि ते आपण स्वीकारले. तेव्हा आपण संविधान मानत नाही, त्यात मनुस्मृती नाही, आम्ही ती मानत नाही, अस आरएसएसने म्हटलं होतं, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी वादाला आणखीनच वाट मोकळी करून दिली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!