महाराष्ट्र

Raosaheb Danve : काय सांगू…! मुलाच्या मतदारसंघातूनच मिळाली पछाड

Buldhana : मेहनत घेऊनही अपयश आले हाती 

महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात बदल झाल्याचा फटका भाजपाला चांगलाच बसला आहे. लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचे नेते रावसाहेब दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कार्यकर्त्यांची समजूत काढतांना त्यांनी, काय सांगू…? माझ्या मुलाच्या मतदारसंघात सुद्धा मला लीड मिळली नाही ! असे भाष्य दानवे यांनी केले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे समाज माध्यमांशी संवाद साधताना माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.

लोकसभेच्या निवडणूक झाल्या आणि त्यामध्ये भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. कार्यकर्ते खचून गेल्याचे स्पष्ट दिसून आले. त्यामुळे, कार्यकर्त्यांना या अपयाशातून बाहेर काढण्यासाठी मी आता मतदारसंघाचा दौरा सुरु केला. 13 तारखेला अंबड, पैठण आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व विधानसभेचा दौरा करणार. आगामी काळात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मी आता विभागवार बैठका देखील घेणार आहे. असे आवाहनही रावसाहेब दानवे यांनी केले आहे.

या निवडणुकीच्या वेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अपार कष्ट करून मेहनत घेतली. मात्र अपयश हाती आले. निवडणुकीत पराभवाची वेगवेगळी कारणे असतात. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नक्कीच आम्ही कष्ट करून बाजी मारू. ”कोणत्या एका व्यक्तीमुळे आमचा पराभव झाला नाही. राज्याच्या वातावरणामध्ये अचानक बदल झाला आणि त्याचा फटका पक्षाला बसला. ”माझ्या मुलाच्या मतदारसंघात सुद्धा मला लीड मिळाली नाही. मग त्यात माझ्या मुलाने माझ्या विरोधात, काम केलं, असं म्हणू का? त्यामुळे कुणालाही दोष देता येणार नाही.” असे दानवे म्हणाले.

Maratha Reservation : जरांगे-पाटलांकडून पुन्हा आरपारची लढाई

विधानसभेत जिंकण्याचा विश्वास

लोकसभेच्या निवडणूक झाल्या आणि त्यामध्ये भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. कार्यकर्ते खचून गेल्याचं दिसलं. त्यामुळे कार्यकर्त्यांना या अपयशातून बाहेर काढण्यासाठी मी आता मतदारसंघाचा दौरा सुरु केला. टप्प्याटप्प्याने सर्व विधानसभेचा दौरा करणार आहे. या निवडणुकीच्या वेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. मात्र अपयश आलं. निवडणुकीत पराभवाची वेगवेगळी कारणे असतात. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नक्कीच आम्ही कष्ट करून बाजी मारू,” असा विश्वासही दानवे  यांनी  व्यक्त केला आहे.

माझ्या पराभवाच्या आनंदात होणार सामील

‘रावसाहेब दानवे पराभूत झाले तर मी माझी टोपी उतरवेन’, असा शब्द सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दिला होता. त्यावरही दानवे यांनी भाष्य केले आहे. अब्दुल सत्तारांच्या टोपी काढण्याच्या कार्यक्रमाला मी नक्की जाणार. माझा पराभव झाल्याचा आनंद सत्तारांना होत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे”, असेही दानवे म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!