Gondia Politics : या 420 सरकारला बहुमत प्राप्त होत नसल्यामुळे अनेक पक्षांचे नेते फोडून आयात करण्याच्या प्रसंग या भाजपवर आला आहे.
रामटेकमधील काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने अवैध ठरवले आहे. यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्षाने दुसऱ्या उमेदवाराचा बॅकअप फॉर्म भरलेला होता. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. परंतु भाजप पक्ष घाबरलेला पक्ष आहे आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आपला पराभव होईल, या भीतीने अशा प्रकारची कामे करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
35 वर्षांपासून भाजप आणि राष्ट्रवादीची लढाई होती. आता तिकडे राहिली ती आपली पैदास आहे, असे म्हणत कुणाचेही नावं न घेता महाविकास आघाडीला प्रफुल पटेल यांनी टोला लगावला होता. त्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की राष्ट्रवादी ही काँग्रेसची पैदास होती आणि ती वाईट होती. ती आता निघून गेलेली आहे. त्याच्यातच आम्ही समाधानी होत, असा प्रतिटोला नाना पटोलेंनी प्रफुल पटेल यांना लगावला.
केंद्र सरकार घाबरले आहे. म्हणून लहान-लहान पक्षांना जवळ घेत आहे. अब की बार 400 पार चा नारा भाजप देत आहे. यामध्ये अमरावतीची नवनीत राणांचीही एक जागा आहे. याबाबत विचारले असता. नाना पटोले म्हणाले की सध्याची केंद्र सरकार 420 सरकार आहे आणि या 420 सरकारला बहुमत प्राप्त होत नसल्यामुळे अनेक पक्षांचे नेते फोडून आयात करण्याच्या प्रसंग या भाजपवर आला आहे. आमचा पक्ष सर्वात मोठा आहे, असे दाखवणाऱ्या पक्षाला आज इतर पक्षांची मदत घ्यावी लागते. यावरूनच स्पष्ट होत आहे की केंद्र सरकारच्या विरोधात जनमानसाचा रोष आहे, असेही नाना पटोले म्हणाले.