महाराष्ट्र

Ramgiri Maharaj : आचारसंहिता लागताच धमकी; प्रचंड फौजफाटा

Ahilya Nagar : धर्मावर बोलल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं संरक्षण

Eknath shinde : नाशिक येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनात एका धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराज यांना धमकी मिळाली आहे. हम बताने आ रहे है सही क्या और गलत क्या. हुजुर की शान मे गुस्ताखी बर्दाश नही करेंगे. चलो सरला बेट, अशी पोस्ट पोस्ट संभाजीनगर आणि अहिल्यानगरच्या सोशल माध्यमांवर सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. त्यानंतर सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 

आंदोलन

रामगिरी महाराज यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आंदोलन झालं होतं. महाराष्ट्रातील राजकारण देखील चांगलचं तापलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र रामगिरी महाराज यांना संरक्षण पुरवलं होतं. आचारसंहिता लागू झाल्यानंतर आता पुन्हा यासंदर्भातील पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. सोशल माध्यमावर एका समाजाकडून पोस्ट व्हायरल करत संभाजीनगरमध्ये एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर सरला बेटावर पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. रामगिरी महाराजांनी सुमारे दीड महिन्यापूर्वी वादग्रस्त विधान केलं होतं.

परिसरात तणाव

व्हायरल पोस्टनंतर प्रशासन आणि पोलिस सतर्क झाले आहेत. अहिल्यानगर येथील सरला बेटावर दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलं आहे. त्यांच्या मदतीला बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे (BSF) बंदूकधारी जवान, संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. रामगिरी महाराजांचा भक्त परिवारही मोठ्या संख्येने सरला बेटावर जमला आहे. त्यामुळे येथे तणावाची परिस्थिती आहे. या साऱ्यात रामगिरी महाराज आपल्या दैनंदिन कीर्तन कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहेत.

रामगिरी महाराज यांच्या वक्तव्यानंतर यात आमदार नीतेश राणे यांनीही उडी घेतली. राणे यांनी थेट अल्पसंख्यांक समाजावर टीका केली. रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन करत हिंदू जागरण मेळाव्याच्या माध्यमांतून नितेश राणे वादग्रस्त विधाने केली होती. गोदावरीच्या काठावर सराला बेट मठ आहे. 2009 पासून रामगिरी महाराज येथे महंत आहेत.

Ramgiri Maharaj : वादग्रस्त रामगिरी महाराजांवर बुलढाण्यात दोन गुन्हे

वादग्रस्त विधान

गेल्या पंधरा वर्षांत सरला बेटाचा मोठा विकास झाला आहे. पर्यटन क्षेत्र म्हणूनही हा परिसर उदयाला आला आहे. अशात रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) वैजापूरमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. यावेळी टायरही जाळण्यात आले होते. त्यानंतर रामगिरी महाराज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत व्यासपीठावर एकत्र आले होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!