देश / विदेश

BJP  : रामदास आठवले यांनी खरगेंना सुनावले

Ramdas Athawale : सरकार कधीही पडू शकत नाही

Political War : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर निशाणा साधत विधान केले आहे. देशात एनडीएचे सरकार चुकून स्थापन झाल्याचे खरगे म्हणाले. पंतप्रधान मोदींकडे जनादेश नाही. एनडीए सरकार कधीही पडू शकते. देशाला मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी काम केले पाहिजे. जे चांगले चालले आहे, त्याला वाईट करणे आपल्या पंतप्रधानांची सवय आहे. असे खरगे म्हणाले. यावरून आरपीआय नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि जेडीयू नेते केसी त्यागी यांनी खरगे यांना धारेवर धरले. 

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, “मल्लिकार्जुन खर्गे यांना विचारा, मनमोहन सिंह यांचे सरकार जेव्हा स्थापन झाले तेव्हा युपीएची आघाडी का झाली? तेव्हा काँग्रेस पक्षाकडेही अजिबात बहुमत नव्हते.  युपीएचे सरकार असताना भाजपने असा कोणताही प्रश्न उपस्थित केला नाही. असे मला आठवतंय. यूपीए सरकार दहा वर्षे टिकली होती, मग एनडीए सरकार का टिकणार नाही? असा प्रश्नही रामदास आठवले यांनी उपस्थित केलायांनी उपस्थित केला.

आमचा पाठिंबा सदैव 

साधारणपणे, ज्या पक्षाची सत्ता असते त्याच पक्षाकडे लोकसभेचे अध्यक्षपद असते. यासोबतच हे पद सर्वात मोठ्या घटक पक्षासाठी राखीव असल्याचेही मानले जात आहे. आम्ही किंवा आमचे नेते नितीश कुमार यांनी कोणत्याही टप्प्यावर या पदाची मागणी केलेली नाही किंवा आमच्या मनात असे काहीही नाही. अशा परिस्थितीत भाजप या पदासाठी ज्या उमेदवाराची निवड करेल त्याला आमचा पाठिंबा सदैव असेल. असेही रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

Mumbai News : खासदाराच्या मेहुण्याला मोबाईल वापरणे पडले भारी ! 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे एनडीएचे सरकार फार काळ टिकणार नसल्याचा दावा करत आहेत, असे केसी त्यागी यांना विचारले असता ते म्हणाले की, हे खरगेजींचे शब्द आहेत, ही त्यांची इच्छा नाही. सरकारमध्ये राहण्यासाठी जेडीयूने लोकसभा अध्यक्षपद मागितले आहे, असे विरोधकांकडून जे बोलले जात आहे, त्यावर केसी त्यागी यांनीही उघडपणे उत्तर दिले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!