Assembly Election : ‘द लोकहित’ची बातमी खरी ठरली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार संदीप धुर्वे यांचा उमेदवारांची यादीतील पत्ता कापण्यात आला आहे. या मतदारसंघातून माजी आमदार राजू तोडसाम यांना पुन्हा एकदा भाजपकडून संधी देण्यात आली आहे. आमदार संदीप धुर्वे यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात येईल असे वृत्त ‘द लोकहित’ने अत्यंत जबाबदारीने आणि ठळकपणे प्रकाशित केले होते. हे वृत्त पूर्णतः खरे ठरले आहे. त्यामुळे ‘द लोकहित’च्या विश्वसनीयतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
सावनेर मतदारसंघातून काँग्रेस माजी मंत्री सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना उमेदवारी देईल, हे वृत्त देखील ‘द लोकहित’नेच प्रकाशित केले होते. त्यानुसार केदार यांना उमेदवारी मिळाली आहे. काटोल मतदारसंघातून सलील देशमुख यांनी निवडणूक लढतील, असेही ‘द लोकहित’ने लिहिले होते. त्यानुसार सलील देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील डॉ. अशोक उईके, इंद्रनील नाईक, शिवाजीराव मोघे यांचे सुपुत्र जितेंद्र मोघे, विद्यमान मंत्री संजय राठोड, यवतमाळचे आमदार मदन येरावार यांनाच उमेदवारी मिळेल, असे देखील ‘द लोकहित’ने आपल्या बातमीत नमूद केले होते. हे वृत्त देखील खरे ठरले आहे.
अकोल्यात तिढा
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेस साजिद खान पठाण यांचे नाव पुढे करेल हे वृत्त केवळ ‘द लोकहित’ने प्रकाशित केले होते. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने पठाण यांना उमेदवारी दिली तरी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राजेश मिश्रा हे निवडणूक लढतील अशा आशयाची वृत्तही प्रकाशित करण्यात आले होते. हे वृत्त देखील खरे ठरले आहे. काँग्रेसकडून आमदार नाना पटोले हे साजिद खान पठाण यांच्यासाठी प्रसिद्ध आग्रही आहेत. मात्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दुसरे नाव पुढे केले आहे. असे असले तरी काँग्रेसने नेते खासदार राहुल गांधी हे साजिद खान पठाण यांच्या नावावर शिक्कमोर्तब करतील अशी स्थिती तयार करण्यात आली आहे.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात एमआयएम आपला उमेदवार देईल, असेही ‘द लोकहित’ने एका बातमीत नमूद केले होते. त्यानुसार भाजपची यादी प्रकाशित होताच एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी अकोला पश्चिमसाठी उमेदवार देणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे पुन्हा एकदा ‘द लोकहित’ची बातमी खरी ठरल्याची प्रचिती वाचकांना आली. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे नेते हरीश अलीमचंदानी आणि काँग्रेसचे नेते रमाकांत खेतान हे संपर्कात असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे.
मात्र या मतदारसंघातून अखेरच्या क्षणी मुस्लिम उमेदवारला संधी दिली जाऊ शकते, असे दाट संकेत आहेत. या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे बालमुकुंद भिरड यांचे नाव देखील इच्छुकांच्या यादीत आहे. एकूणच ‘द लोकहित’ने सुरुवातीपासून आजपर्यंत प्रकाशित केलेल्या सर्व बातम्या तंतोतंत खऱ्या ठरले आहे. त्यामुळे सत्य, परखड आणि निर्भीड असलेल्या ‘द लोकहित’च्या नावासमोर आता अत्यंत विश्वासू बातमी देणारे व्यासपीठ, म्हणून वाचक पाहत आहेत.