महाराष्ट्र

Vanchit Bahujan Aghadi : भाजपचे आरक्षण आंदोलन म्हणजे नौटंकीपणा

Protest Of BJP : ‘वंचित’चे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांची टीका

Reservation Issue : काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपने राज्यभरात आंदोलन केले. अकोल्यातही 13 सप्टेंबरला भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावरून आता वंचित बहुजन आघाडीकडून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. भाजपने केलेले आरक्षण आंदोलन म्हणजे निव्वळ नौटंकी असल्याचा आरोप ‘वंचित’चे प्रदेश पदाधिकारी राजेंद्र पातोडे यांनी केला. 

विधानसभा निवडणूक

पातोडे म्हणाले, काँगेस सारखीच आरक्षणविरोधी धोरणे भाजपने आखली आहेत. आरक्षित घटकांना मारक धोरणे भाजपने राबविली आहेत. अनुसुचित जाती-जमाती व ओबीसींकरीता काँग्रेस सापनाथ तर भाजप नागनाथ आहे. असल्याची टीकाही वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी केली आहे. लवकरच राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेसच्या विरोधात भाजपकडून आरक्षणाबाबत आंदोलन करण्यात येत आहे. यात आता वंचित बहुजन आघाडीनेही उडी घेतली आहे.

दुटप्पीपणाचा आरोप

राजेंद्र पातोडे यांनी आरक्षण आंदोलनावरून भाजपवर टीका केली. पातोडे म्हणाले, काँग्रेसने खासगीकरण, जागतिकीकरण आणि उदात्तीकरणाच्या नावावर देशातील आरक्षण संपविण्याची सुरुवात केली. आता राहुल गांधी यांनी आरक्षण संपविण्याचा अजेंडा जाहीर केला. भाजपने 2014 पासून प्रत्यक्ष आरक्षण संपविण्यास सुरुवात केली. टप्प्प्याटप्प्याने हे काम सुरू आहे. काँग्रेस-भाजपने ‘बायलॅटरल एन्ट्री’च्या नावावर आरक्षण डावलून केंद्रातील सचिवपदे भरली. घटनेत नसलेले 10 टक्के आर्थिक आरक्षण लागू केले.

पदोन्नतीमधील आरक्षण दिले नाही. वर्ग एक ते चारच्या जागा आरक्षण न ठेवता खासगी कंपनीमार्फत भरल्या जात आहेत. शिक्षण हक्क कायदा कमकुवत करून टाकला आहे. आरटीई (RTE) शाळांचा हजारो कोटींचा निधी प्रलंबित आहे, असेही पातोडे म्हणाले. केंद्र सरकारने शिष्यवृत्ती मधला 50 टक्के मॅचिंग फंड न दिल्याने शिष्यवृत्ती, स्वाधार निधी 2021 पासून मिळालेला नाही. ओबीसी आरक्षणासाठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक चार वर्षांपासून झालेल्या नाहीत. त्यामुळे खुल्या व आरक्षित घटकांचे प्रतिनिधित्व नाकारले जात आहे. राज्यात ‘प्रशासक राज’ सुरू आहे.

Balasaheb Thorat : आरक्षण बंदबाबत न बोलताही आंदोलन कशासाठी?

खासगीचे पेव

राज्यात सध्या खासगी महाविद्यालय आणि शाळाचे पेव फुटले आहेत. जिल्हा परिषद, नगर पालिका, महापालिकांच्या शाळा बंद होत आहेत. त्यांच्या मोक्याच्या जागा हडप झाल्या आहेत. खासगी कंपनीला त्या जागा वाटल्या जात आहेत. अँग्लो इंडियनसाठी असलेल्या राखीव जागा भाजपने रद्द केल्या. अनुसूचित जाती-जमाती, ओबीसींचा निधी पळविला. हा निधी इतर प्रकल्पांकडे वळविला. मुलींचे मोफत शिक्षण आणि उच्च शिक्षणात जात पडताळणीसाठी मुदतवाढ एससी, एसटीसाठी लागू नाही, असे पातोडे यांनी सांगितले.

फडणवीस यांच्यावर टीका

एससी, एसटींवरील अत्याचार रोखण्यासाठी असलेली ‘हायपावर कमिटी’ देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होते, तेंव्हापासून नाही. राज्यात अनुसुचित आयोग 2017 पासून कार्यरत नाही. भाजपकडून आरक्षित वर्गाची राजकीय, सामाजिक, आर्थिक कत्तल सुरू आहे. त्यामुळे भाजपवाले कोणत्या तोंडाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा घेवून ‘आरक्षण बचाव‘ची नौटंकी करीत आहेत, असा सवालही पातोडे यांनी केला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!