महाराष्ट्र

Raj Thackeray : माझ्या वाट्याला जाऊ नका

Maharashtra Politics : राज ठाकरेंचा उद्धव ठाकरे व शरद पवारांना इशारा

Maharashtra Navnirman Sena : ‘माझ्या दौऱ्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला आहे. आताच सांगतो माझ्या वाटेला जाऊ नका, नाहीतर सभाही घेता येणार नाही, माझी पोर काय करतील हे सांगता येत नाही,’ असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे व शरद पवार यांना दिला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. दरम्यान बीडमध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आज (दि.10) रोजी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ठाकरे म्हणाले, ‘मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या आडून उद्धव ठाकरे, शरद पवारांचं विधानसभेच्या तोंडावर राजकारण सुरु आहे.’

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. बीड मध्ये असताना काही आंदोलकांनी त्यांच्या ताफ्यावर सुपारी फेकत घोषणाबाजी केली. दरम्यान आज राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

ठाकरे म्हणाले, ‘मी माझ्या नवनिर्माण यात्रेचा पहिला टप्पा मराठवाड्यापासून सुरु केला. आज छत्रपती संभाजीनगरला एक टप्पा पूर्ण झाला. मी माझा दौरा आवरता घेतला अशा बातम्या माध्यमांमध्ये वाचल्या. मी कुठला दौरा आवरता घेतला? मी माझ्या दौऱ्यातील गॅप्स कमी केल्या, काही ठिकाणी मुक्काम होता, तो मुक्काम न करता पुढच्या ठिकाणी पोहचलो आणि तिथे बैठका घेतल्या इतकंच.’

आरक्षणाची गरज नाही!

सोलापूरच्या पत्रकार परिषदेत मी जे बोललो ते सगळ्यानी ऐकलं. पण त्याच्या नंतर ज्या बातम्या केल्या गेल्या त्या जाणीवपूर्वक होत्या. म्हणजे राज ठाकरेंचा आरक्षणाला विरोध, राज ठाकरे विरुद्ध मराठा अशा वाट्टेल त्या बातम्या केल्या. मी 2006 ला पक्ष स्थापनेपासून सांगत आलोय की आरक्षण आर्थिक निकषांवर दिलं पाहिजे. आणि त्याहीपलीकडे माझं म्हणणं आहे की, महाराष्ट्राला खरंतर आरक्षणाची गरजच नाही. कारण इथे रोजगार, शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत की, त्या जर आपल्या महाराष्ट्रातील मराठी मुला-मुलींना मिळतील असं बघितलं तर आरक्षणाची मग ते शिक्षण असो की नोकरी यात आरक्षणाची गरजच पडणार नाही. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण द्यावं, पण आपल्याकडे जातींना आरक्षण दिलं जातं. आणि मग स्वतःच्या राजकारणासाठी जातींचा वापर केला जातो, असेही राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या ताफ्यावर ‘सुपारी हल्ला’ !

पत्रकारांनी भडकवलं

जरांगे पाटील यांचा खरंतर माझ्या दौऱ्याशी काहीच संबंध नव्हता. पण जरांगेच्या आंदोलनाचा वापर करून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी राजकारण केलं. आणि यातला दुर्दैवाचा भाग म्हणजे मराठवाड्यातील काही पत्रकार ज्यांची नावं मला माहित आहे. त्यातल्या कुणाला कोणते कॉन्ट्रॅक्ट्स मिळाले आहेत, कुणी कशा गाड्या घेतल्या आहेत, हे सगळं मला माहिती आहे. मी धाराशिवला असताना मला भेटायला लोकं आले होतं त्यांना भडकवायचं काम पत्रकरांनी केलं, असा आरोपही त्यांनी केला.

पवार आणि ठाकरेंसोबत त्यांचे फोटो!

निदर्शन करणाऱ्यांशी बोललो तेव्हा त्यातल्या दोन जणांचे शरद पवारांसोबत फोटो होते. ते फोटो जुने होते असं त्यांचं म्हणणं आहे. तुतारीसोबतचे फोटो जुने कसे असतील? आणि २ जण उद्धव ठाकरे गटाचे होते. परवा मी नांदेडला होतो तेव्हा गेस्टहाऊसच्या बाहेर जे घोषणा देत होते त्यांचे फोटो पण शरद पवारांसोबतचे आहेत. काल बीडमध्ये जे झालं त्यात शिवसेनेचा जिल्हाप्रमुख होता, असा आरोप त्यांनी केला.

म्हणून यांना मतदान झालं!

लोकसभेच्या निकालांनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना वाटत आहे की आपल्याकडे बघून मराठवाड्यात भरघोस मतदान झालं. पण नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधात खरे तर मतदान झालं आहे. मुस्लिम समाजाने देशभर मोदींच्या विरोधात मतदान केलं. दलित बांधवांना संविधान बदलणार असं वाटलं आणि त्यांनी मोदींच्या विरोधात मतदान केलं. आणि मी मागच्या पत्रकार परिषदेत बोललो तसं संविधान बदलणार हे भाजपचे काही लोकं बोलले. आणि त्यातून नरेटिव्ह तयार झालं. आणि त्यांना विधानसभेला पण अशीच खेळी करावीशी वाटली. तर काल निदर्शनं करणाऱ्या उद्धव गटाच्या जिल्हाप्रमुखाला आमच्या लोकांनी चांगला चोप दिला. आणि तो जाताना ओरडत गेला की एक मराठा लाख मराठा. म्हणजे काय यांना जरांगेच्या आंदोलनाच्या आड स्वतःच विधानसभेचं राजकारण करायच आहे, असेही ठाकरे म्हणाले.

जाती द्वेषाचं राजकारण करतात शरद पवार

शरद पवार म्हणतात महाराष्ट्राचा मणिपूर होईल. पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने मणिपूर होऊ नये म्हणून प्रयत्न करायचा तर हेच मणिपूर होईल म्हणत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी यांना मराठवाड्यात दंगली घडवायच्या आहेत. शरद पवारांचं राजकारण जाती-जातीत द्वेष निर्माण करणं हेच आहे आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सुरु असल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला.

Uddhav Thackeray : रॅण्ड घोटाळा करणाऱ्या गुप्ताची उबाठाने दिल्लीत घेतली भेट !

माझं मोहोळ जर उठलं ना!

माझ्या दौऱ्यात अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. उद्या माझं जर मोहोळ उठलं, तर यांना एकही सभा घेता येणार नाही. त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये. मी मागे म्हणलं होतं यांच्याकडे प्रस्थापित आहेत, माझ्यामागे विस्थापित आहेत. माझी पोरं काय करतील यांना कळणार पण नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!