महाराष्ट्र

Lok Sabha Election : माढा, बारामतीत महायुती सक्षमच राहणार

Rahul Kul : नागपुरात घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

Nagpur News : माढा आणि बारामती मतदारसंघात महायुतीचाच डंका कायम राहिल असे ठाम मत आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले. माढा आणि बारामती मतदारसंघातील निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार राहुल कुल आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नागपुरात उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर राहुल कुल यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

राहुल कुल म्हणाले, देवेंद्र फडणीस यांच्यासोबत नियमित बैठक झाली. माढा आणि बारामती या दोन्ही मतदारसंघात महायुतीचे संबंध अधिक चांगले असले पाहिजे. त्यासंदर्भात महत्त्वाची चर्चा नागपुरात झाली. आम्ही महायुतीच्या सगळे प्रमुख कार्यकर्ते कामाला लागले आहोत. टप्प्याटप्प्याने ज्या काही समस्या येत आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी काम सुरू आहे. माढ्यातही महायुतीने मदत करावी. सगळ्या पक्षांनी अशा पद्धतीने काम मागील आठवड्यात सुरू केले आहे. पुढेही असेच काम सुरू राहणार आहे.

महायुती धर्म पाळणार

माढा आणि बारामतीच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचा धर्म पाळला गेला पाहिजे. यासाठी सर्वच पातळीवर, सर्वच विषयांवर चर्चा चालू आहे. देवेंद्र फडणवीस हे प्रश्न सोडवतील, असा विश्वास आहे. दौंडबाबत सर्व जण एकजुटीने काम करीत आहेत. सर्व समावेशक काम होईल अशा पद्धतीची व्यवस्था केली जात आहे, असे राहुल कुल यांनी सांगितले.

Lok Sabha Election : काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे बसपाची निर्मिती

माढावर ‘फोकस’

रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, फक्त माढा हा सध्या जास्त ‘फोकस’ केल्याचे माध्यमातून दिसत आहे. आतापर्यंत विरोधात निवडणूक लढली गेली आहे. त्यामुळे त्याठिकाणी काही नाराजी आहे. वरच्या पातळीवर नाराजी दूर झाली तर खालच्या पातळीवर ती दूर होईल. अडचणी सोडवत मार्ग काढायचा असतो, असा विषय होत असतो. माढाची जागा शरद पवार यांनी लढवलेली असल्यामुळे येथे राष्ट्रवादी काँग्रेसची आक्रमकता जास्त असते. पूर्वी एकमेकांच्या विरोधात झालेले संघर्ष एका क्षणात दूर होत नाहीत. ते टप्प्याटप्प्याने दोन्ही पक्षातील नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सोडवतील.

निवडणुकीत उभे राहत असताना पंतप्रधान राहुल गांधी बनणार की पंतप्रधान नरेंद्र मोदी बनणार हे मर्यादीत नसते. देशाचे धोरण आणि राजकारण आणि प्रगतीचा वेग त्यातून ठरतो. त्यामुळे समोरील उमेदवार कोण आहे, यापेक्षा मोदींना लोकांचा समर्थन आहे हे बघायला हवे असे, निंबाळकर म्हणाले. गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. आताही महायुतीच्या सरकारमध्ये पक्ष सत्तेत आहे. आम्हाला ‘काउंटर’ सहकार्य करण्याची अपेक्षा नव्हती. या ठिकाणी निवडणुकीचा विषय असल्याने माहायुतीचा धर्म पाळावा हा विषय होता. आमदार राहुल कुल आणि आपण दोघे खूप जवळचे मित्र आहोत. माढा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मदत करावी, ही त्यांची प्रमुख भूमिका आहे. याबाबत सविस्तर चर्चा झालेली आहे, असे रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!