Congress News : जोरदार शक्ति प्रदर्शन करत राहुल यांनी रायबरेलीतून उमेदवारी दाखल केला. हा मतदारसंघ काँग्रेसचा गड मानला जातो. येथून फिरोज गांधींनी पहिली निवडणूक जिंकली होती. राहुल गांधी यांनी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन राहुल गांधी यांनी केले.
अर्ज दाखल करताना राहुल गांधी यांच्या सोबत अनेक जण होते. आई सोनिया गांधी, बहीण प्रियंका गांधी आणि अशोक गेहलोत यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. गांधी यांनी रायबरेली निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या रायबरेली मतदारसंघ आहे. येथून निवृत्तीची घोषणा करत सोनिया गांधी यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला होता. त्यांच्या जागेवर राहुल गांधी यांना काँग्रेसने रायबरेलीतून उमेदवारी दिली. त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती.
रायबरेलतीतून 16 वेळा मिळवला विजय
रायबरेल नेहरू-गांधी घराण्याचा परंपरागत मतदारसंघ आहे. इंदिरा गांधी, त्यांचे पती फिरोज गांधी हे येथून लढले. सोनिया गांधींपर्यत 16 वेळा गांधी-नेहरू कुटुंबातील व्यक्ती इथून विजयी झाली आहे. 1977 मध्ये जनता पार्टीच्या राज नारायण यांनी इंदिरा गांधींचा पराभव केला होता. 1980 मध्ये इंदिरा गांधी तिथून पुन्हा खासदार म्हणून निवडून आल्या.
Lok Sabha Election : उज्ज्वल निकम कसले वकील ते तर देशद्रोही..
सोनिया गांधी यांनी 2004 ते 2024 या काळात रायबरेली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र, आता त्या राज्यसभेवर निवडून आल्या आहेत. रायबरेली हा राहुल गांधी यांच्या आई सोनिया गांधी यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. अमेठी आणि रायबरेली हे गांधी-नेहरू घराण्याचे पारंपारिक क्षेत्र मानले जातात कारण या कुटुंबातील सदस्यांनी अनेक दशकांपासून या जागांचे प्रतिनिधित्व केले आहे. उत्तर प्रदेश लोकसभा निवडणुकीत अमेठी आणि रायबरेलीच्या जागा काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात.
राहुल गांधींसमोर निवडून येण्याचं आव्हान
लोकसभेच्या 80 जागा असलेल्या उत्तर प्रदेशातून गांधी घराण्यातील व्यक्ती न लढणं हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम करणारं आहे. त्यामुळेच राहुल गांधींनी रायबरेली मतदारसंघ निवडला. परंतु रायबरेलीतून निवडून येण्याचं आव्हान राहुल गांधी समोर असणार आहे.