Political News : 2014 आणि 2019 ची निवडणूक छोट्या घटक पक्षांनी भारतीय जनता पक्षाला पूर्ण समर्थन देउन लढली. छोट्या पक्षांच्या महनतीमुळेच दोन्ही वेळा विजय खेचून आणता आला. पुढेही आम्ही त्याच ताकदीने लढू. मात्र पक्षातील आयाराम-गयारामांचे किती लाड पुरवायचे, यावर काही निर्बंध असावेत. कारण आयाराम-गयारामांचे लाड पुरविताना छोट्या पक्षांकडे दुर्लक्ष केले जाते. मग आम्ही फक्त लढण्यापुरतेच कामाचे आहोत का, असा सूचनावजा सवाल रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, रयत क्रांती संघटनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये चांगले काम केले. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधामध्ये आमचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढले, तुरुंगामध्ये गेले, अंगावरती गुन्हे घेतले. भविष्यकाळात विधानसभेला सामोरे जात असताना जे छोटे घटक पक्ष आहेत त्यांना सन्मानजनक वागणूक देणे अत्यंत गरजेचे आहे. एकंदरीत या निवडणुकीमध्ये आपल्याला स्पष्ट जाणवले की, आयाराम गयाराम यांचे किती लाड पुरवावे यालाही कुठेतरी थोडसं निर्बंध असणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले
वाडा विरुद्ध गावगाडा असेच लढू
2014ला भारतीय जनता पक्षाबरोबर रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना, रिपब्लिकन असे आम्ही सर्व छोटे पक्ष होतो. आम्ही महाराष्ट्रामध्ये सत्ता आणली 2019 ला ही आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर होतो. कारण आमची विस्थापिताची बाजू घेऊन आम्ही लढाई लढत असतो. प्रस्थापितांच्या विरोधात आम्ही लढत असतो. वाडा विरुद्ध गावगाडा आम्ही गाव गाड्यांच्या बाजूला असतो. येणाऱ्या विधानसभेला गावगाडा आणि विस्थापित सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर बाराबलुतेदार यांचेही नेतृत्व प्रतिबिंब म्हणून आम्ही करत असतो आणि त्यांचे प्रतिबिंब हे येणाऱ्या विस्तारामध्ये उमटले पाहिजे आणि निश्चितपणाने तो सन्मान घटक पक्षांना देणे अत्यंत गरजेच आहे. वाडे जर आपण जपत राहिलो तर निश्चितपणे आमचेही कार्यकर्ते मग फक्त लढाई पुरते आहेत का? त्यांनी प्रश्न उपस्थित केला .
कार्यकर्त्यांच्या भावना समजा
आमच्याही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नैराश्य निर्माण होतात, ते होऊ नये असे माझी अपेक्षा आहे. कारण हातकणंगले लोकसभा मतदारसंघ गेल्यावेळी सुद्धा मोठ्या ताकदीने आम्ही विजय मिळवला. यावेळी सुद्धा मिळवू्. प्रामाणिकपणे आम्ही महायुतीमध्ये काम करत आलेलो आहोत. आमच्याही कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत, ही अपेक्षा आहे, असे देखील सदाभाऊ खोत म्हणाले.