Nagpur : कुणाला कृत्रिम पाय, कुणाला कृत्रिम हात, तर कुणाला ई-रिक्षा… गडकरी दिलासा देत होते आणि दिव्यांगांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटत होते. हे चित्र होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या जनसंपर्क कार्यक्रमातील. अॉगस्ट महिन्यात गडकरींनी दोन जनसंपर्क कार्यक्रम घेतले. पण दोन्ही महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासमध्ये झाले. त्यांच्या त्यांच्या कार्यालयातील नियमित जनसंपर्काला प्रचंड गर्दी झाली.
यापूर्वीचे दोन जनसंपर्क कार्यक्रम नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासमध्ये आयोजित करण्यात आले. त्यावेळी महानगरपालिकेशी व नासुप्रशी संबंधित समस्यांचीच निवेदने गडकरींनी स्वीकारली होती. यंदा कार्यालयात नियमित जनसंपर्क असल्यामुळे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, तरुणांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. दिव्यांगांनी सरकारी योजनांमधून मदत मिळण्याबाबत, कृत्रिम अवयव मिळण्याबाबत, ई-रिक्षा तसेच ट्रायसिकल मिळण्याबाबतची निवेदने गडकरींना दिली. काहींनी वैद्यकीय मदत मिळण्यासंदर्भातही निवेदन दिले. गडकरींनी प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच तातडीने मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
काही दिव्यांगांनी उपचारासाठी वैद्यकीय मदत मिळावी, असेही निवेदन दिले. विविध मागण्यांची निवेदने स्वीकारत गडकरींनी दिव्यांगांना आधार दिला. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने मदत करण्याच्या सूचना गडकरींनी दिल्या. खामला चौकातील जनसंपर्क कार्यालयात त्यांनी विविध मागण्यांची निवेदनेही स्वीकारली.
Jode Maro Andolan : फडणवीस म्हणाले, ‘महाराजांनी सुरत लुटले नाही’
आपण पुढाकार घेतल्यामुळे..
काहींच्या हाती मागण्यांची निवेदने होती तर काही लोक केवळ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आले होते. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसह महिलांच्या संदर्भातील मागण्यांची निवेदने गडकरींनी स्वीकारली. त्याचवेळी ‘आपण पुढाकार घेतल्यामुळे काम झाले’ अशी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या नागरिकांच्या शुभेच्छाही त्यांनी स्वीकारल्या. वैयक्तिक कामांसह प्रशासकीय कामांपर्यंत सर्व प्रकारच्या विषयांसाठी यावेळी नागरिकांनी त्यांची भेट घेतली.
भाजपसाठी स्वतंत्र वेळ
गडकरींच्या जनसंपर्क कार्यक्रमात प्रथमच भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र वेळ राखीव ठेवण्यात आला होता. त्यानुसार गडकरी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भेटले. यावेळी भाजपचे नागपूर शहराध्यक्ष जितेंद्र (बंटी) कुकडे, माजी नगरसेवक अॅड. निशांत गांधी आदींची उपस्थित होती. पदाधिकाऱ्यांसोबत आलेल्या नागरिकांनी आपल्या मागण्यांची निवेदने गडकरींना दिली. जनसंपर्क कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांची गर्दी होते. अशात भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची निवेदने स्वीकारण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळेच जनसंपर्क कार्यक्रमात त्यांच्यासाठी स्वतंत्र वेळ राखीव ठेवण्यात आला होता, असे कळते.