Protest march : बांगलादेशातील हिंदू, बौद्ध, जैन आणि अन्य अल्पसंख्यकांवर होणारे हल्ले, त्यांच्या हत्या आणि अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन पुकारण्यात येणार आहे. यासाठी एका सुकाणू समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनांतर्गत येत्या आज 10 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने बुलढाण्यात एका भव्य आक्रोश मोर्चाचेही आयोजन करण्यात आले आहे. या मोर्च्यात हिंदू बांधवांनी निषेध नोंदविण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून बांगलादेशात दररोज बलात्कार, खून, लुटमार, जाळपोळीच्या घटना घडत आहेत. या घटना निंदनीय असून मानवजातीला काळीमा फासणाऱ्या आहेत. केवळ हिंदू आहेत म्हणून हा अत्याचार होत आहे. त्यामुळे सकल हिंदू समाजाच्या वतीने बुलडाणा येथे आयोजित आक्रोश मोर्चात हिंदू बांधवांनी हजारांच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. आज, 10 डिसेंबरला दुपारी गर्दे सभागृहातून हा मोर्चा निघणार असून तहसील चौक, संगम चौक, जयस्तंभ चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे.
केंद्रीयमंत्री जाधव यांनीही केले आवाहन
बांग्लादेशात अल्पसंख्यांक हिंदू समुदायावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने बुलडाणा येथे, आज 10 डिसेंबरला आक्रोश न्याय मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चाला मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना नेते तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडूनही करण्यात आले आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून बांग्लादेशात अल्पसंख्यांक हिंदू समाजावर अत्याचार होत आहेत. दररोज बलात्कार, खून, लुटमार, जाळपोळीच्या घटना घडत आहेत. या घटना निंदनीय असून मानवजातीला काळीमा फासणाऱ्या आहेत. केवळ हिंदू आहेत म्हणून हा अत्याचार होत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेचा निषेध नोंदणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने बुलडाणा येथे आयोजित आक्रोश मोर्चात हिंदू बांधवांनी हजारांच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना नेते तथा केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे.
राज्यभरात आंदोलने
बांगलादेशमध्ये होत असलेल्या अल्पसंख्याक हिंदू नागरिक व साधू संतांवर होत असलेल्या अपमानजनक कारवाई विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध नोंदविण्यात येत आहे. यावेळी सकल हिंदू समाज, विविध सामाजिक संस्था पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह हिंदू बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. बांगलादेश येथे हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ देशभर निषेध व्यक्त केला जात आहे. आज मंगळवारी राज्यभरातील अनेक शहरात आक्रोश मोर्चा, निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.